विकास करताना ‘कोकणचे कोकणपण’ टिकवून ठेवा – सुरेश प्रभू

दापोली : ‘कोकणच्या निसर्गाचा ऱ्हास न करता विकास झाला पाहिजे. विकास करताना ‘कोकणचे कोकणपण’ टिकवून ठेवा.कोकणी माणूस विकासाच्या ध्येय्याने झपाटलेला आहे.या झपाटलेपणाला विचाराचे अधिष्ठान दिले पाहिजे.नैसर्गिक साधन संपत्तीला नष्ट न करता आर्थिक विकास झाला पाहिजे.सरकारी विकास मर्यादित असतो.भूभागाचा विकास करताना व्यक्तीचा विकासदेखील झाला पाहिजे’,असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केले.

कै.कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठान तर्फे आयोजित ‘कोकणचा शाश्वत विकास’ या दोन दिवसीय परिसंवादाला चांगला प्रतिसाद मिळाला.परिसंवादातील पहिले सत्र शनिवार १९ जून आणि दुसरे सत्र रविवारी २० जून रोजी उत्साहात पार पडले.या परिसंवादाचा समारोप सुरेश प्रभू यांनी केला.

पहिल्या दिवशी कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ संजय सावंत,’गद्रे मरिन्स ‘चे दीपक गद्रे,प्रगतिशील शेतकरी विनायक महाजन,देसाई बंधू आंबेवाले उद्योगाचे संचालक जयंत देसाई,माजी नगराध्यक्ष बिपीन पाटणे,डॉ प्रकाश शिंगारे हे मान्यवर सहभागी झाले.दुसऱ्या दिवशी कोकण भूमी प्रतिष्ठान चे संस्थापक संजय यादवराव, पर्यटन विभागाचे उपसंचालक हनुमंत हेडे,अभ्यासक डॉ दीपक आपटे,डॉ उमेश मुंडले हे मान्यवर सहभागी झाले. पर्यटन,पायाभूत सुविधा विकास, पर्यावरण व पाणी व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू म्हणाले,’कोकणच्या निसर्गाचा ऱ्हास न करता विकास झाला पाहिजे. विकास करताना ‘कोकणचे कोकणपण’ टिकवून ठेवा. कोकणी माणूस विकासाच्या ध्येय्याने झपाटलेला आहे.या झपाटलेपणाला विचाराचे अधिष्ठान दिले पाहिजे.नैसर्गिक साधन संपत्तीला नष्ट न करता आर्थिक विकास झाला पाहिजे.मोठा पाऊस आपल्याबरोबर कस असलेली माती वाहून नेणार नाही,याकडे लक्ष दिले पाहिजे. 

कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ संजय सावंत म्हणाले,’नैसर्गिक संकटात कोकणी माणूस खचून गेला असला तरी कोकणचे अर्थकारण जपण्यासाठी शेती जपली पाहिजे आणि ती करताना व्यावसायिक दृष्टिकोन ठेवले पाहिजे.कोकणची तुटीची शेती फायद्यात आणली पाहिजे.चाकरमान्या माणसांना गावाशी जोडून ठेवली पाहिजे. शाश्वत विकास होताना त्याचा वेग पेलणारा असला पाहिजे आणि लोकसहभाग असला पाहिजे.

संजय यादवराव म्हणाले,’कोकणसाठी पायाभूत सुविधांचा विकास झाला पाहिजे.कोकण पर्यटनाची लोक चळवळ झाली पाहिजे.फुकेत बेटाला १२ किनारे असूनही २५ हजार कोटीचे अर्थकारण होते,हे उदाहरण लक्षात ठेवले पाहिजे.पश्चिम महाराष्ट्रातील साखर उद्योगाला मदत करणाऱ्या सरकारने कोकणातील पर्यटन

Leave a Reply

%d bloggers like this: