दापोडी येथील कार्यशाळेची परिवहनमंत्री अनिल परब यांनी केली पहाणी

पुणे – राज्य परिवहन महामंडळाच्या दापोडी येथील कार्यशाळेची परिवहनमंत्री अनिल परब यांनी आज प्रत्यक्ष भेट देवून पहाणी केली.

यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, कार्यशाळा व्यवस्थापक खैरमोडे यांच्यासह कार्यशाळेतील सर्व संबंधीत अधिकारी, कर्मचारी उपस्थितीत होते.

परिवहनमंत्री परब यांनी बसनिर्मिती प्रक्रिया, त्यासाठी लागणारा कालावधी, उपलब्ध सोई-सुविधा, कर्मचारी यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधत, त्यांच्या कार्यप्रणाली संबंधी माहिती घेतली. या प्रसंगी दापोडी कार्यशाळेतील विविध कर्मचारी संघटनांनी मा.परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांचे स्वागत केले.

Leave a Reply

%d bloggers like this: