अनिरुद्ध देशपांडे यांना ‘ग्रीनटेक लीडिंग डायरेक्टर पुरस्कार २०२१’ जाहीर
पुणे : उद्योजक व अमनोरा टाउनशीप विकसित करत असलेल्या सिटी कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे यांना प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘ग्रीनटेक लीडिंग डायरेक्टर पुरस्कार २०२१’ जाहीर झाला आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात गोवा येथे होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात देशपांडे यांना haaपुरस्कार प्रदान करण्यात येईल.
नवी दिल्ली येथील ग्रीनटेक फाउंडेशन चॅरीटेबल ट्रस्ट तर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना पुरस्कार देवून गौरवले जाते. सन २००० मध्ये स्थापन झालेल्या या ट्रस्टच्या सल्लागार मंडळामध्ये विधी व न्याय, उच्च शिक्षण, उद्योग आदी क्षेत्रातील प्रथितयश व्यक्तींचा समावेश आहे.
देशपांडे यांची पुरस्कारांसाठी निवड करताना ते कार्यरत असलेल्या उद्योग क्षेत्रात आणि सामाजिक कार्यात उच्च दर्जाचे मापदंड प्रस्थापित करून अपेक्षित प्रगती साध्य करणे, नाविन्यपूर्ण व कल्पक अशा योजनांचा समावेश करून त्या यशस्वीरीत्या राबवणे आदी बाबींचा विचार केला गेला.
