Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राम मंदिर – भाजप – शिवसेना कार्यकर्त्यांचा शिवसेना भवन समोर राडा

मुंबई – अयोध्येतील राम मंदिराच्या ट्रस्टने जमीन घोटाळा प्रकरणावरून शिवसेना आणि भाजपामधील वाद टोकाला पोहचले आहेत. या प्रकरणावरूनच आज मुंबईतील दादर परिसरातील शिवसेना भवनासमोर शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते आमने-सामने आले असून तुफान राडा झाला आहे. राम मंदिर जमीन खरेदी घोटाळावरुन सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर टीका करण्यात आली होती. त्यामुळे या अग्रलेखाचा निषेध करण्यासाठी भाजपने आज फटकार मोर्चा काढला होता. यावेळी शिवसैनिक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. तसेच भाजपा युवा मोर्चाकडून आज शिवसेना भवन येथे विरोध प्रदर्शन करण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading