Saturday, May 30, 2026
BusinessLatest News

होंडातर्फे भारतात 2021 गोल्ड विंग टुर लाँच

 नवी दिल्ली – उच्च दर्जाच्या लक्झरी टुरिंगची समीकरणे पुनर्प्रस्थापित करत होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. ने आज भारतात 2021 गोल्ड विंग टुर लाँच केली. नवे मॉडेल जपानमधून सीबीयू* पद्धतीने भारतीय बाजारपेठेत येणार आहे. (*कम्पलिटली बिल्ट अप)

2021 गोल्ड विंग टुर ही एयरबॅगसह ड्युएल क्लच ट्रान्समिशन (डीसीटी) देणारी भारतातील एकमेव मोटरसायकल आहे. भारतात लवकरच मॅन्युअल ट्रान्समिशनचा पर्याय देण्याचाही विचार आहे.

हे लाँच आणि प्रीमियम मोटरसायकल व्यवसायाच्या विस्ताराविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालकअध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अत्सुशी ओगाता म्हणाले, 1975 मधे सुरुवात झाल्यापासून होंडा गोल्ड विंगने दुचाकी प्रवासाचा असामान्य अनुभव दिला आहे. दशकांपासून या मोटरसायकलने स्वतःचा वेगळा मार्ग आखत आलिशानपणादर्जा आणि आरामादायीपणा यांचे नवे मापदंड तयार केले आहेत. 2021 गोल्ड विंग टुर हे बहुप्रतिक्षित मॉडेल आमच्या प्रीमियम मोटरसायकल उत्पादन श्रेणीत समाविष्ट करताना आम्हाला आम्हाला अभिमान वाटत आहे.

याप्रसंगी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. च्या विक्री आणि विपणन विभागाचे संचालक श्री. यदविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, ‘शहरातील प्रवास किंवा खुल्या महामार्गावर प्रवास करण्यासाठी सर्वात आलिशान दुचाकीचा मापदंड असलेली 2021 गोल्ड विंग टुर सर्वाधिक आरामदायीपणा देते. होंडाचे हे प्रमुख मॉडेल दमदार डिझाइन, अत्याधुनिक उपकरण व वैशिष्ट्ये यांचा ताळमेळ घालणारी आणि भारतात खऱ्या अर्थाने ‘आर्ट ऑफ लक्झरी टुरिंग’ची समीकरणे नव्याने प्रस्थापित करणारी आहे.’

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading