आमदार संजय शिंदे यांच्या शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज प्रकरणी अतुल खूपसे – पाटील यांचे पुण्यात भीक मांगो आंदोलन

पुणे – करमाळा तालुक्याचे आमदार संजय शिंदे यांनी विठ्ठल कॉर्पोरेशन, म्हैसगाव तालुका माढा जिल्हा सोलापूर च्या माध्यमातून शेतकऱ्यांना 2013 साली खत देतो म्हणून  कागदपत्रे जमा केली संबंधित शेतकऱ्यांना खत न देता दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करून पुण्यातील कोथरूड परिसरात असलेल्या  पंजाब नॅशनल बँकेकडून शेतकऱ्यांच्या नावे कर्ज स्वरूपात रक्कम 22  कोटी 11 लाख  उचलल्याचे समोर आले आहे. याबाबत कारखान्याचे चेअरमन आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व ती रक्कम शेतकऱ्यांच्या नावावर जमा करावी या मागणीसाठी उजनी धरण पाणी समितीचे अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज पुण्यातील कॅम्प मधील पंजाब नॅशनल बँके समोर भीक मागो आंदोलन करण्यात आले

अतुल खूपसे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार वंदन करून आंदोलनाला सुरुवात केली. आंदोलनाच्या वेळी अतुल खूपसे पाटील म्हणाले भीक मागो आंदोलन करून जी रक्कम भेटेल ती पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकाऱ्यांकडे व आमदार संजय शिंदे यांना देऊ. प्रत्येक शेतकऱ्यांच्या नावावर 2 ते 3 लाख कर्ज उचलावयचे आणि कर्जमाफी होईपर्यंत थांबायची आणि कर्जमाफीत ते बसवून बँकेचे अधिकारी मॅनेज करून त्या ठिकाणी कर्जमाफीचा लाभ उचलायचा आम्ही या बाबत पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले आहे, त्यांनी बँकेच्या संबंधीत अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले पण अजूनही कारवाई करण्यात आली नाही.

दरम्यान,आंदोलनाच्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून आंदोलनास येण्यास निघताना पोलिसांनी त्यांच्या काही कार्यकर्त्यांना अटक केली व त्यांचे आंदोलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ अडविले.

आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढच्या वेळेस एडी ऑफिस समोर 1500 शेतकरी कार्यकर्ते घेऊन आंदोलन करणार असल्याचे अतुल खूपसे पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: