खासदार गिरीश बापट यांच्याकडून तृतीयपंथीयांना मदत

पुणे – कोरोनाची सद्यस्थितीत दोन वेळेचे जेवण मिळणं अवघड झाले असताना समाजापासून नेहमीच वंचीत असणाऱ्या तृतीयपंथीना थोडीशी मदत म्हणून पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्याकडून धान्य किट वाटप करण्यात आले.


खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते तृतीय पंथीना मोफत मास्क ,सॅनिटीझर ,धान्य किटचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे नियोजन आरपीय राष्ट्रीय निमंत्रक मंदार जोशी यांनी केले या कार्यक्रमास भाजपचे संजली सोनावणे,पुष्कर तूळ जापुकर  भारतीय जनता पार्टी चे प्रवते उपमहापौर सुनीता वाडेकर व  पदाधिकारी उपस्थित होते तृतीयपंथी मोठ्या संख्येने उपस्थित होते .


मंदार जोशी म्हणाले आपण सगळ्यांनी टाळेबंदीत 2 महिने काढले टाळेबंदीमुळे सामान्य जनतेला खूप आर्थिक  अडचण आली जास्त  तृतीयपंथीयांना आर्थिक अडचण आली. आम्ही टाळेबंदी मध्ये पण लोकांना धान्य व मास्क वाटप केले माझ्या मनात विचार आला की आपण तृतीयपंथीयांना मदत केली तर मी दादा पुढे तृतीयपंथीयांना विचार करण्याचा विचार मांडला दादांनी त्याला होकार दिला आज तृतीयपंथीयांना मदत करताना खूप आनंद होत आहे. 
संजली सोनावणे म्हणाल्या आम्ही दादांच्या मिळणाऱ्या पगारातून आम्ही गरजू लोकांना तृतीयपंथीयांना मदत करत आहोत नागरिकांनी जे शासनाचे नियम पाळले त्यामुळे आज कोरोना कमी होत आहे आज मंदार जोशी यांनी तृतीयपंथी साठी जी मदत केली त्याबद्दल ममता जोशी यांचे आभार मानले पाहिजे.
खासदार गिरीश बापट म्हणाले तृतीयपंथीयांना मी 24 तास त्यांना कसलीही गरज लागली तरी मी त्यांना सदैव मदत करेल.

Leave a Reply

%d bloggers like this: