सापडलेले पैसे, पाकीट आणि महत्त्वाची कागदपत्रे केली परत…

पुणे – कामाच्या गडबडीत दुकानावर जायची ओढ असल्याने संभाजी ब्रिगेडचे मा. शहर संघटक मा. संजय चव्हाण हे चाकणला दुकानावर जाण्यासाठी निघाले होते. गाडीवरून जात असताना रेंज हिल्स, विश्रांतवाडी येथे त्यांना एका अनोळखी व्यक्तीचे पाकीट सापडले. ज्या मध्ये त्या व्यक्तीचे श्री चंद्रशेखर रामचंद्र गवळी, (इंदिरा वसाहत, गणेश खिंड रोड, औंध, पुणे) हजारो रुपये आधार कार्ड, पॅन कार्ड, एटीएम कार्ड आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे सापडली. त्या व्यक्तीचा नुकताच पूर्ण पगार त्याच दिवशी झालेला होता. अशावेळी संजय चव्हाण यांच्यातील कॕडरबेस प्रामाणिक कार्यकर्ता जागा झाला आणि ते पाकीट सदर व्यक्तीला द्यायचे ठरवले. मात्र त्या व्यक्तीचा फोन नंबर नसल्यामुळे त्यांनी ते सापडलेले पाकीट घरी घेऊन आले. महत्वाची काबळ कागदपत्रे परत मिळत नसतात.

संध्याकाळी लगेच संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांना त्यांनी महत्त्वाची कागदपत्रे व पाकीट सापडल्याचे कळवले. त्यांनी लगेच सदर व्यक्तीच्या घरी, पत्त्यावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्याच संध्याकाळी चव्हाण पत्ता शोधत खात्री करण्यासाठी त्या व्यक्तीच्या घरी गेले. आपल्या नवर्‍याचे हरवलेले पाकीट ज्याला सापडला तो व्यक्ती स्वतःहून आलेला पाहून त्या व्यक्तींची पत्नी अक्षरशः पाया पडायला लागली. गवळी घरी हजर नसल्याने त्यांना आज ११.०० वा. स्वारगेटला बोलावण्यात आले. सर्व कागदपत्रांची खात्री केल्यानंतर त्या व्यक्तीला ते सन्मानाने पाकीट परत करण्यात आले. गवळी ही व्यक्ती अत्यंत सर्वसाधरण आणि गरीब कुटुंबातील असल्यामुळे अत्यंत भावनिक झाले होते.

सध्याच्या कठीण काळात पैशाची किंमत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना नक्कीच कळते. कारण अडचणीच्या काळात मदत करणे हा तसा कार्यकर्त्यांचा स्थायीभाव आहे. अशा काळात सापडलेली वस्तू परत देणे हाच खरा मानवधर्म आहे. लोकांना फसवून, चोरी करून किंवा सेटलमेंट करून पैसे कमण्यापेक्षा स्वकर्तुत्वावर कष्टाने पैसे कमावण्या मध्ये संभाजी ब्रिगेड च्या विचारधारेचा विश्वास आहे. संभाजी ब्रिगेडच्या प्रामाणिक कामामुळे आज आम्हाला एक कार्यकर्ता आणि हक्काचे कुटुंब मिळालं.

गवळी यांना त्यांचे पाकीट देताना संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे संजय चव्हाण उपस्थित होते. संजय चव्हाण (70307 43313) सारखे हजारो कार्यकर्ते महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेडच्या विचारधारेने घडले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: