कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस लि. चा आयपीओ १६ जून रोजी खुला होणार
मुंबई – कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस लिमिटेड (“कंपनी” किंवा “केआयएमएस हॉस्पिटल्स”) आपल्या इक्विटी शेअर्सच्या प्रारंभिक सार्वजनिक प्रस्तावाशी (“आयपीओ”/ “ऑफर”) निगडित बोली/प्रस्ताव बुधवार, जून १६, २०२१ रोजी खुला करणार आहे. बोली/प्रस्तावाचा कालावधी शुक्रवार, जून १८, २०२१ रोजी समाप्त होईल. या प्रस्तावाचा प्राइस बॅण्ड प्रति इक्विटी शेअर ८१५ ते ८२५ रुपये एवढा निश्चित करण्यात आला आहे.
आयपीओमध्ये २,००० दशलक्ष रुपये एकत्रित मूल्य असलेल्या ताज्या जारीकरणाचा (“फ्रेश इश्यू”) समावेश आहे आणि २३,५६०,५३८ इक्विटी शेअर्सपर्यंत विक्रीचा प्रस्ताव (“ऑफर फॉर सेल”) यात आहे. यातील १६,००३,६१५ इक्विटी शेअर्सची विक्री जनरल अटलांटिक सिंगापोर केएच प्रायव्हेट लिमिटेडद्वारे (“इन्व्हेस्टर सेलिंग शेअरहोल्डर”), ३८७,९६६ इक्विटी शेअर्सची विक्री डॉ. भास्करा राव बोलिनेनींद्वारे, ७७५,९३३ इक्विटी शेअर्सची विक्री, राज्यश्री बोलिनेनींद्वारे, ३८७,९६६ इक्विटी शेअर्सची विक्री बोलिनेनी रामनैय्या मेमोरियल हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेडद्वारे (सर्व मिळून “प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर्स”) होणार आहे. ६,००५,०५८ इक्विटी शेअर्सची विक्री, जून ९, २०२१ या तारखेच्या रेड हेरिंग प्रोस्पेक्ट्सच्या (“आरएचपी”) परिशिष्ट ए मध्ये नमूद व्यक्तींद्वारे केली जाणार आहे (“अन्य विक्री करणारे समभागधारक”, “इन्व्हेस्टर सेलिंग शेअरहोल्डर्स” आणि “प्रमोटर्स सेलिंग शेअरहोल्डर्स” हे “सेलिंग शेअरहोल्डर्स”च्या सोबत विक्री करणार आहेत आणि या इक्विटी शेअर्सना “ऑफर्ड शेअर्स” असे म्हटले जाईल).
या ऑफरमध्ये कंपनीच्या पात्र कर्मचाऱ्यांद्वारे (एलिजिबल एम्प्लॉयीज) सबस्क्रिप्शनसाठी २०० दशलक्ष एकत्रित मूल्याचे शेअर्स राखीव ठेवण्यात आले आहेत (“एम्प्लॉयी रिझर्वेशन पोर्शन”). याशिवाय प्रस्तावामध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांना एम्प्लॉयी रिझर्वेशन पोर्शनमधील एलिजिबल एम्प्लॉयी बिडिंगमध्ये ऑफर प्राइसवर ४० रुपये सवलत देण्यात आली आहे.
एम्प्लॉयी रिझर्वेशन पोर्शन वजा जाता उरलेल्या ऑफरला “नेट ऑफर” असे म्हटले जाते.
किमान १८ इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर १८च्या पटीतील इक्विटी शेअर्ससाठी बोली लावली जाऊ शकते.
ही ऑफर, सिक्युरिटीज काँट्रॅक्ट्स (नियमन) नियम, १९५७च्या सुधारित स्वरूपातील (“एससीआरआर”) नियम क्रमांक १९(२) (बी) आणि सुधारित सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिसक्लोजर रिक्वायरमेंट्स) नियमन, २०१८ (“सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्स”) यांच्यानुसार देण्यात येत आहे. ही ऑफर बुक बिल्डिंग प्रोसेसमार्फत, सेबी आयसीडीआर नियमनांमधील नियम ६ (२)ची पूर्तता करून दिली जात आहे. या नियमानुसार नेट ऑफरचा किमान ७५ टक्के भाग क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्सना (“क्यूआयबी”, “क्यूआयबी पोर्शन”) वितरित केला जाणार आहे. यासाठी कंपनीचा बोर्ड किंवा आयपीओ समिती, यापैकी ज्या कोणाला अधिकार असतील, त्यांनी बुक रनिंग लीड मॅनेजर्सशी चर्चा करून क्यूआयबी पोर्शनचा ६० टक्क्यांपर्यंतचा भाग सेबी आयसीडीआर नियमनांची पूर्तता करून अँकर इन्व्हेस्टर्सना विवेकबुद्धीच्या आधारे वितरित केला असणे आवश्यक आहे (“अँकर इन्व्हेस्टर पोर्शन”). यातील एक तृतीयांश भाग देशांतर्गत म्युच्युअल फंडांसाठी राखीव असेल. यासाठी अँकर इन्व्हेस्टर्सना ज्या किंमतीला वितरण केले गेले, तेवढ्या किंमतीच्या किंवा त्याहून अधिक वैध बोली देशांतर्गत म्युच्युअल फंडांकडून येणे आवश्यक आहे
