Monday, June 15, 2026
Latest NewsPUNE

चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा

पुणे – कोविड-19 चे अनुषंगाने लॉकडाऊन चे कालावधीत कोरोणाचा प्रादुर्भाव अधिक वाढू नये या करीता शासनाने केलेल्या नियमावली मुळे गेली अनेक महिने जिम + व्यायामशाळा बंद ठेव्यावा लागल्याने आर्थिकदृष्ट्या हवालदिल झालेल्या ट्रेनर…कोचर्स..प्रशिक्षक यांना आर्थिक मदत देण्याच्या कार्यक्रमा चे आयोजन भाजपा चे नगरसेवक प्रसन्न जगताप यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने करण्यात आले.

या कार्यक्रमात पुणे शहर आणि जिल्ह्यामधील गेली वर्षभर बंद असलेल्या जिम. व्यायामशाळे मधील एकूण ५० जिम ट्रेनर..प्रशिक्षक यांना प्रत्येकी रु.१०००/- रोख,मानचिन्ह व पुष्प देवून आर्थिक मदतीचा हात दिला.
अशा पद्धतीने अशा कार्यक्रमाचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्र राज्यमध्ये पुणे शहरात सर्वप्रथम आयोजन करण्यात आले. हा अनोखा कार्यक्रम पुणे जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेचे सहकार्याने संमपन झाला. सादर कार्यक्रमास आमदार भीमराव तापकीर,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मंगेश पाटील,अभय ठकार ,तसेच मतदार संघाचे अध्यक्ष सचिन मोरे, पुणे जिल्हा हौशी शरीर सोष्टव संघटनेचे अध्य्क्ष सुहास नांगरे, विल्यम अब्राहम, प्रशांत जगताप, सागर येवले हे उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading