महिंद्रातर्फे नव्या ग्लोबल डिझाईन ऑर्गनायझेशनच्या नेतृत्वपदी प्रताप बोस यांची नियुक्ती

मुंबई – महिंद्रा समूहाने आज त्यांच्या नव्याने तयार झालेल्या ग्लोबल डिझाईन ऑर्गनायझेशनच्या नेतृत्वासाठी कार्यकारी उपाध्यक्ष आणि प्रमुख डिझाईन अधिकारी म्हणून प्रताप बोस यांची नियुक्ती करत असल्याचे जाहीर केले. जागतिक दर्जाची अत्याधुनिक विश्वासार्ह उत्पादनांची निर्मिती, रचना आणि विकास करून गतिशील भविष्याला आकार देणे याप्रती महिंद्राची जी बांधिलकी आहे तिला नवजीवन देण्याचे काम ग्लोबल डिझाईन ऑर्गनायझेशन करत आहे.

ग्लोबल डिझाईन ऑर्गनायझेशनमध्ये अलिकडेच जाहीर करण्यात आलेला युनायटेड किंग्डमच्या वेस्ट मिडलँडस मधील कॉव्हेन्ट्री येथे वसविण्यात आलेला महिंद्रा अॅडव्हान्स्ड डिझाईन युरोप (एम.ए.डी.ई.) आणि सध्याच्या महिंद्रा इंडिया डिझाईन स्टुडीओ (एम.आय.डी.एस.) यांचा समावेश होणार आहे. ग्लोबल डिझाईन ऑर्गनायझेशनमध्ये अत्युच्च दर्जाच्या कौशल्याचा अंतर्भाव  असणार असून जागतिक तंत्रज्ञानाचा ठसा ते विस्तारणार आहेत.

एम.ए.डी.ई आणि एम.आय.डी.एस. या दोन्हीसाठी प्रताप बोस जबाबदार राहणार असून सगळ्या प्रमुख व्यवसाय उत्पादनांच्या डिझाईनवर त्यांचे लक्ष असेल. त्यामध्ये अस्सल एसयूव्ही बॉर्न इलेक्ट्रिक व्हेईकल (बीईव्ही), एलसीव्ही उत्पादने (<३.५ टी), लास्ट माईल मोबिलिटी (एलएमएम), लार्ज सीव्हीज, पीजोट स्कूटर्स (फ्रान्स), ट्रक्टर्स आणि शेतीसाठीची यंत्रं यांचा समावेश आहे. प्रताप हे २४ जून २०२१ रोजी रुजू होणार असून महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या ऑटो अँड फार्म सेक्टर्सचे कार्यकारी संचालक राजेश जेजुरीकर यांच्या नेतृत्वाखाली काम करतील.

प्रताप हे रॉयल कॉलेज ऑफ आर्ट, लंडन आणि नॅशनल इंन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, भारत या संस्थांचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांच्याकडे स्वयंचलन क्षेत्रातील डिझाईनचा जागतिक पातळीवरचा २० वर्षांचा समृद्ध अनुभव गाठीशी आहे. युनायटेड किंग्डममध्ये टाटा मोटर्स मध्ये ते गेली १४ वर्षे कार्यरत होते. त्यापूर्वी इटलीतील पिआजिओ आणि जपानच्या डेमलर क्रिस्लर कंपनीमध्ये त्यांनी काम केले होते.

या घोषणेबद्दल बोलताना महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या ऑटो अँड फार्म सेक्टर्सचे कार्यकारी संचालक राजेश जेजुरीकर म्हणाले, “शेती आणि वाहन क्षेत्रात परिवर्तनाला चालना देत असल्यामुळे या क्षेत्रात आपण आता नव्या वळणावर आलो आहोत. पुढच्या पाच वर्षात आपली २३ नवीन उत्पादने सादर होणार असून त्यामुळे स्वयंचलन, कृषी आणि दुचाकी वाहनांच्या क्षेत्रात आपली नवीन, अत्याधुनिक अभियांत्रिकी क्षमता बहरून येणार आहे. प्रतापचा समावेश आपल्या टीम मध्ये झाल्यामुळे आपली डिझाईन क्षमता बळकट होणार असून आपल्या उत्पादनांची आणि ग्राहकांची संख्या विस्तारणार आहे. आपल्या समूहात त्यांचे स्वागत करण्यासाठी आम्ही खूपच उत्सुक आहोत आणि त्यांच्या येण्यामुळे महिंद्राच्या समृद्ध उत्पादन वारशात नवीन अध्याय लिहिला जाईल.”

Leave a Reply

%d bloggers like this: