स्व.सौ.मंगला परतानी सेवा प्रतिष्ठानतर्फे १००० रिक्षाचालकांना अन्नधान्य किट

पुणे : रिक्षाचालकांचे हातावरचे पोट आहे. रिक्षा चालली आणि रोज प्रवासी बसले, तरच पैसे मिळणार असा रिक्षाव्यवसाय आहे. तरच घरामध्ये चूल पेटणार आहे. त्यामुळे शहराच्या पूर्व भागात सोमवार, मंगळवार पेठेतील १००० रिक्षाचालकांना स्व.सौ.मंगला परतानी सेवा प्रतिष्ठान, पुणे तर्फे अन्नधान्य किट देण्यात आले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतिष्ठानचे अध्यक्ष अ‍ॅड.नितीन परतानी यांनी अन्नधान्य किट वाटप सप्ताहाचे आयोजन केले. सप्ताहात कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेशदादा बागवे, माजी आमदार मोहन जोशी, माजी आमदार उल्हास पवार, माजी महापौर कमलताई व्यवहारे, अ‍ॅड.अभय छाजेड, संजय बालगुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध टप्प्यांमध्ये रिक्षाचालकांना अन्नधान्य किट देण्यात आले.

याप्रसंगी बाळासाहेब दाभेकर, भगवान धुमाळ, प्रा.वाल्मिक जगताप, सुनील दैठणकर, दिलीप पवार, अनिल हांडे, राजू अरोरा, गोपाळ पायगुडे, राजेश शिंदे, वसंत खेडेकर, सुनिल काकडे, आयाज खान, फैय्याज शेख, विजय वारभुवन यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

रमेशदादा बागवे म्हणाले, रिक्षाचालकांचे पोट हातावर असते. सध्याच्या काळात त्यांना मदत करणे हे काँग्रेस कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे व त्या विचाराने नितिन परतानींनी या कार्यक्रमाचे केलेले आयोजन कौतुकास्पद आहे. यापुढे आपण समाजातील प्रत्येक गरजू घटकापर्यंत पोहोचायला हवे.

मोहन जोशी म्हणाले, रिक्षाचालक आणि मालकांसाठी कल्याणकारी मंडळ कसे असावे, कायदा कसा असावा, यासाठी आम्ही समिती नेमली होती. कॅबिनेटने देखील त्याला मंजुरी दिली. पण त्यानंतर भाजपाचे सरकार आले, त्यावेळी मागील पाच वर्षात देवेंद्र फडणवीस सरकारने याची अंमलबजावणी केली नाही. आता लवकरात लवकर रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळाचा विषय कॉंग्रेसच्या माध्यमातून पूर्ण करु, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: