पुणे शहरात दिवसभरात 388 रुग्ण कोरोना मुक्त

पुणे- मागील काही दिवसांपासून शहरामध्ये नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त  होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 242 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 388 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 74 हजार 112 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 62 हजार 610 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 9 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 7 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8475 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरामध्ये सध्या 3027 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 511 रुग्ण गंभीर आहेत. तर 822 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 5532 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. आज पर्यंत शहरात 25 लाख 78 हजार 773 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 30 हजार 863 रुग्णांपैकी 9 लाख 99 हजार 826 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.
ॲक्टिव्ह रुग्ण 13 हजार 710 आहे.
कोरोनाबाधित एकूण 17 हजार 327 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मृत्यूचे प्रमाण 1.68 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 96.99 टक्के आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: