कोरोनाचे नियम पायदळी तुडवत पर्यटकांची  सिंहगडावर प्रचंड गर्दी

पुणे : मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसामुळे सर्वत्र निसर्गाची विविध रुपे पाहायला मिळत आहे. उन्हाळ्यात रखरखीत झालेले डोंगरमाथे पुन्हा बहरले अन् पर्यटकांना खुणावू लागले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले निर्बंध देखील प्रशासनाकडून टप्प्याटप्प्याने शिथिल केले जात आहेत. नागरिक जणू याच संधीची वाट पाहत होते असेच काहीसे  चित्र आज सिंहगडावर दिसून आले. पर्यटन ठिकाणी राज्य सरकारकडून जमावबंदी लागू असून देखील पर्यटकांनी या ठिकाणी प्रचंड गर्दी केली होती.
सलग दोन महिने टाळेबंदीमुळे नागरिक घरात बसून होते राज्य सरकारने टाळेबंदी शिथिल केल्यामुळे सुट्टीचं निमित्त साधत शनिवार आणि रविवारी सकाळी 7 वाजल्यापासून पर्यटकांनी सिंहगडावर प्रचंड गर्दी केली. सिंहगड किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पोलीस फाटा तैनात असताना देखील पर्यटक पोलिसांकडे दूर्लक्ष करीत किल्ल्यावर जात होते. इतकेच नव्हे तर खडकवासला धरण परिसरात पर्यटकांना मज्जाव असताना देखील  पर्यटक पोलीसांना चकवा देवून विविध मार्ग शोधत येथे जात होते. त्यामुळे आपण कोरोनाचा किती गांभीर्यान विचार करतो, हाच प्रश्न पुन्हा उपस्थित होत आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: