Pune – सेव्हन लव्हज चौक ते वखार महामंडळ चौक उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला


पुणे – सेव्हन लव्हज चौक ते वखार महामंडळ चौक उड्डाणपूल चे उद्घघाटनभाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. या उड्डाणपूलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले असून व तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

या कार्यक्रमाला खासदार गिरीश बापट, मुरलीधर मोहोळ महापौर, आमदार सुनील कांबळे,  सभागृह नेते गणेश बिडकर,  माजी आमदार योगेश टिळेकर, नगरसेवक आबा शिळीमकर उपस्थित होते. तर  विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे ऑनलाइन उपस्थित होते. 

याप्रसंगी स्थानिक नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले काल शिवसेना व राष्ट्रवादीने स्टंट करत काल या  उड्डाणपुलाचे  उद्घघाटन केले. शिवसेना व राष्ट्रवादी या प्रभागात मागच्या निवडणुकीमध्ये त्याचे उमेदवार हे प्रचंड मतांनी पराभुत झाले आहेत. त्यांचे  या प्रभागात काहीच काम नाही त्यामुळे ते उड्डाणपूल चे उद्घघाटन करून आम्हीच उड्डाणपूल पूल बांधला असे दाखवत आहेत. या प्रभागातील लोकांना माहित आहे .की हा   उड्डाणपुल कोणी बांधला आमदार माधुरी मिसाळ, नगरसेवक आबा  शिळीमकर,  खासदार गिरीश बापट यांनी यासाठी भरपूर प्रयत्न केले त्यांच्यामुळे  हा उड्डाणपूल पूर्ण झाला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की,  श्रीनाथ भिमाले यांनी आज भरपूर चांगले काम केले आहे, पुण्यातील रस्ते हे  छोटे आहेत यामुळे मोठी  वाहतूक कोंडी होते.  हा उड्डाणपूल बांधल्यामुळे वाहतुकीची समस्या दुर होणार आहे. 2017 साली पुणे महानगरपालिकेत सर्वपक्षीय नगरसेवक यांच्या एकजुटीने हा प्रस्ताव मान्य झाला श्रीनाथ भिमाले यांनी महानगरपालिकेत उड्डाणपुलाचा प्रश्न मांडला आमच्या सरकारच्या काळात हा प्रश्न मार्गी लागला तेव्हापासून त्याचे काम सुरू होते. तत्कालीन  स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली मी आज बाणेर वरून येत होतो मी दोन तास ट्रॅफिक मध्ये अडकलो होतो कोरोना संपला की काय असेच वाटत होते दुसरी लाट अजूनही संपलेली नाही .राज्य शासनाने लॉकडाउन लावल्यामुळे प्रेशटं कमी झाले लोकांनी अजूनही शिस्त पाळायला पाहिजे असेही पाटील यांनी सांगितले. 

 

Leave a Reply

%d bloggers like this: