दिग्दर्शक मधुर भांडारकरला आवडली मेहूल चोक्सी आणि बारबरा जबारिकाची कथा 

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक मधूर भांडारकर यांना पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी मेहूल चोक्सी आणि त्यांची कथित प्रेयसी बारबरा जाबारिका यांची कथा आवडली आहे. मला ही कथा थोडी वेगळी वाटत असून यावर एखादी वेबसिरीज किंवा चित्रपट होवू शकतो, असे त्यांनी ट्विट करत म्हटले आहे. नेटकऱ्यांनी ही या ट्विट ला चांगलया प्रतिक्रियाही दिल्या आहेत. ‘अनेकांनी म्हटलं की तुम्हीच बनवा’, ‘तर काहींनी म्हटलं लवकरच घोषणा करा.’ मधूर भांडारकर यांनी यापूर्वी पेज 3, फॅशन, कॉरपोरेट, इंदू सरकार आशा दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

भारतातील पीएनबी या मोठ्या घोटाळ्यातील फरार आरोपी मेहूल चोक्सी आता कॅरेबियाई देशात असून डोमिनिका पोलिसांच्या ताब्यात आहे. मे महिन्यात तो अँटीगुआ देशातून फरार झाला होता. त्यानंतर तो डोमिनिकामध्ये सापडला. चोक्सीची कथित गर्लफ्रेंड बारबरा जाबारिका ही देखील सध्या चर्चेत आहे. पण आपण चोक्सीची गर्लफ्रेंड नसल्याचं तिने नुकतेच स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: