अभिनेत्री रिया चक्रवर्ती दिसणार ‘द्रौपदी’च्या भूमिकेत

अभिनेता सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती प्रकाशझोतात आली होती. काही दिवसापूर्वीच ‘बिग बॉस १५’ च्या नव्या सीजनमध्ये रिया चक्रवर्ती दिसणार आणि यात ती सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अडकल्यानंतर तिची बाजू लोकांसमोर मांडणार आहे, असं बोलल जात आहे. तर दुसरीकडे, नुकतीच रियाची सर्वात आकर्षक महिलांमध्ये निवड झाल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे सगळीकडे रियाची चर्चा आहे. तिच्या एकामागो मग एक चर्चा सुरु झाल्यानंतर तिला आता काही चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्याचं समोर येत आहे. रियाला चित्रपट सृष्टीमध्ये म्हणावे तसे यश मिळाले नाही. उलट सुशांत प्रकरणामुळे तिचे करिअर देखील धोक्यात आले होते. मात्र आता रिया पुन्हा एकदा चित्रपटात दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. रियाला ‘महाभारत’ कथेवर आधारीत एका चित्रपटासाठी द्रौपदीचा रोल ऑफर करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: