Sunday, June 21, 2026
Latest NewsPUNE

‘चेकमेट -२०२१ :दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन

पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेसच्या वतीने ‘चेकमेट -२०२१ या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन ११,१२ जून रोजी ऑनलाईन करण्यात आले आहे.

व्यवस्थापनशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान विषयक चर्चा या दोन दिवसीय कार्यशाळेत होणार आहे. देश आणि परदेशातून विविध मान्यवर त्यात सहभागी होणार असल्याची माहिती अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेसचे प्रभारी संचालक डॉ रोशन काझी यांनी दिली. कार्यशाळेचे हे तेरावे चर्ष आहे.’इनोव्हेटिव्ह प्रॅक्टिसेस इन इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी एंड बिझनेस मनेजमेंट’ असा या कार्यशाळेचा विषय आहे. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार ,उपाध्यक्ष आबेदा इनामदार हे या कार्यशाळेचे पेट्रन आहेत.

डॉ उमेश देशपांडे,डॉ एचजीएच रजा सुलतान रजा कासीम(मलेशिया),डॉ मुजतबा मोमीन(कुवैत ),डॉ नायला एजाझ (कॅनडा),डॉ बालमुरलीथर बालकृष्णन (मलेशिया )डॉ मुर्तझा जुनैद फारुख (ओमान ) इत्यादी मान्यवर या कार्यशाळेत सहभागी होतील. अधिक माहिती या संकेत स्थळावर देण्यात आली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading