काँग्रेस पक्षातर्फे कोविड रुग्णांना दैनंदिन वापराच्या वस्तूंची भेट

पुणे – शहरातील ससून, नायडू आणि अन्य रुग्णालयातील एक हजार कोविड रुग्णांना दैनंदिन वापरातील वस्तू काँग्रेस पक्षातर्फे शुक्रवारी भेट देण्यात आल्या.

गेले वर्षभर कोविड साथीमध्ये काँग्रेस पक्षातर्फे विविध प्रकारची मदत केली जात आहे. एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यास लगेचच त्याला रुग्णालयात दाखल केले जाते. या गडबडीत दैनंदिन वापराच्या वस्तू विसरल्या जातात आणि रुग्णालय अथवा विलगीकरण केंद्रामध्ये रुग्णांची गैरसोय होते, असे अनुभव रुग्णांकडून ऐकल्यानंतर काँग्रेस पक्षातर्फे या वस्तू वाटपाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, असे माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी ससून रुग्णालयात वस्तू भेट देताना सांगितले.

दैनंदिन वापराच्या वस्तूंमध्ये खोबरेल तेल, साबण, टूथ पेस्ट, टूथ ब्रश यांचा समावेश आहे. या वस्तूंचे कीट मोहन जोशी यांच्या हस्ते ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.मुरलीधर तांबे आणि परिचारिका, वैद्यकीय स्टाफ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी सर्वश्री अॅड.शाबीर खान, प्रशांत सुरसे, चैतन्य पुरंदरे, चेतन अगरवाल, आयुब पठाण, भरत सुराणा, नरेश धोत्रे उपस्थित होते.

कोविड रुग्णांसाठी अत्यावश्यक वस्तूंची मदत केल्याबद्दल डॉ.तांबे यांनी मोहन जोशी यांचे आभार मानले. हा उपक्रम यापुढेही चालू राहील असे मोहन जोशी यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: