Saturday, May 30, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

ऐतिहासिक ‘होन’च्या साक्षीने यंदाचा राज्याभिषेक सोहळा साजरा होणार

मुंबई – शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे छत्रपतींनी ट्विटद्वारे शिवकालीन ‘होन’चा अत्यंत दुर्मिळ फोटो शेअर केला आहे. ‘स्वराज्याचे सार्वभौमत्न व संपन्नतेचे प्रतीक असणारा होन हे केवळ चलन नसून आपली अस्मिता आहे. हा राष्ट्राचा अमूल्य ऐतिहासिक ठेवा आहे. रायगडाच्या पवित्र भूमीत मिळालेल्या ऐतिहासिक ‘होन’च्या साक्षीने यंदाचा राज्याभिषेक सोहळा साजरा होणार’,असे संभाराजीराजे छत्रपती यांनी सांगितले आहे.

दरम्यान, शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा हा राष्ट्रीय उत्सव व्हावा ही माझी मनापासून इच्छा असल्याचे संभाजीराजेंनी म्हटले. गेल्या वर्षीही लोकांना घरी राहण्याचे आवाहन केले असता ते घरी राहिले त्यांचे मी आभार मानतो. यंदाची परिस्थितीही तशीच आहे. त्यामुळे ‘शिवराय मनामनांत शिवराज्याभिषेक दिन घराघरांत’ या भावनेतून हा सोहळा साजरा करा, असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी शिवप्रेंमींना केले आहे.

तसेच मी सर्वाना शिवजयंती घरी राहून साजरी करा असे म्हणत असलो तरी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाम आहे,असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणासंदर्भात ज्या पाच मागण्या केल्या आहेत त्या मागण्या मान्य केल्या नाही तर थेट रायगडावरुन आंदोलनाची भूमिका मांडू असा पुन्हा एकदा इशारा संभाजीराजेंनी दिला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading