कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपक्रम
पुणे – सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले,
पुण्याचे युसुफ फाउंडेशन आणि मुंबईचे आयपीएस अधिकारी माननीय कैसर खालिद सर आणि त्यांचे पासबान – ए- अदब एनजीओ
च्या वतिने पुण्यात कोविड साथ रोखण्यासाठी वेगेवगळे उपक्रम सूरु आहेत. यामध्ये चेक पोस्ट वर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला मिनरल वॉटर बॉटल वाटप , मास्क वाटप तसेच गरजू व्यक्तींना रियुझेबल मास्क वाटप चा उपक्रम गेले अनेक दिवस झाले सुरु आहे.
येरवडा परिसरात मास्क चे वाटप वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस शेख यांचे हस्ते झाले. यावेळी युसुफ फाउंडेशन चे अध्यक्ष जावेद शेख, उपाध्यक्ष कुमार कार्तिक (हुगार) आणि स्वयंसेविका अश्विनी गावडे उपस्थित होते.
