कोरोना – राज्यात मंगळवारी २४ तासांत १४ हजार १२३ नवीन रुग्ण, ४७७ जणांचा मृत्यू
मुबाई -राज्यात मंगळवारी २४ तासांत १४ हजार १२३ नवीन कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले. तर ४७७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६७ टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत ९६ हजार १९७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच
राज्यात १४ हजार १२३ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५७ लाख ६१ हजार ०१५ वर पोहोचली आहे. अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २ लाख ३० हजार ६८१ झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,५२,७७,६५३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५७,६१,०१५ (१६.३३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १७,६८,११९ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून ९,३१५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात रुग्ण मोठ्या प्रमाणात बरे होताना पाहायला मिळत आहे. मंगळवारी राज्यात ३५ हजार ९४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ५४,३१,३१९ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९४.२८ टक्के एवढे झाले आहे.
पुणे शहर अपडेट
- दिवसभरात ३८४ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
- दिवसभरात ८५८ रुग्णांना डिस्चार्ज.
- पुण्यात करोनाबाधीत ३९ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ११.
- ७८४ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
- पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४७०३११.
- पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ५५१८.
- एकूण मृत्यू -८२८४.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४५६५०९. - आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ५९६४.
