तरुण युवकाने वाढदिवसनिमित्त राबविले समाजोपयोगी उपक्रम
पुणे — कोरोना आणि लॉकडाऊन मुळे अनेक नागरिकांचे रोजगार बुडाले आहेत. यामुळे गरजू नागरिकांना बिबवेवाडी या भागातील आदित्य जागडे या तरुणाने शंकर महाराज, पापळ वस्ती या ठीकानी स्वतःच्या खर्चाने मोफत सॅनिटायजेशन करून गरजु लोकांना धान्य वाटप केले. तसेच बिबवेवाडी पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांना मास्क वाटप करण्यात आले. पापळ वस्ती येथील लोकांना वाफ मशीन वाटप करण्यात आले व नागरिकासाठी मोफत आरोग्य शिबीरचे आयोजन केले भरपूर लोकांनी मोफत आरोग्य शिबीराचा लाभ घेतला.
