तंत्र शिक्षण परिषदेच्या सहकार्याने भारती विद्यापीठ आयएमईडी मध्ये प्रशिक्षण उपक्रमास प्रारंभ
पुणे : अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या ट्रेनिंग अँड लर्निंग ऍकेडमी (अटल)च्या सहकार्याने भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी )मध्ये आयोजित फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमला ३१ मे रोजी भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.माणिकराव साळुंखे यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला.
३१ मे ते ४ जून दरम्यान ‘मास्टर क्लास आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड डीप लर्निंग’या विषयावर फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम होत आहे. भारती विद्यापीठाच्या व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता आणि इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी) चे संचालक डॉ सचिन वेर्णेकर अध्यक्षस्थानी असून प्रोग्रॅमचे संयोजन डॉ श्याम शुक्ला हे करीत आहेत.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग, पायथॉन इंप्लीमेंटेशन, ओपन सोर्स व्हिज्युअल प्रोग्रॅमिंग, टूल्स, रिग्रेशन मॉडलिंग, एरर मेट्री, रँडम फॉरेस्ट, डिस्टन्स मेजर्स अशा अनेक विषयावर या प्रोग्रॅममध्ये मार्गदर्शन करण्यात येत आहे.
शिक्षण, अध्ययन, अद्यापन प्रणालीमध्ये मोठया प्रमाणावर बदल होत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणी डीप लर्निंगचा उपयोग या प्रक्रियेत करून घेतला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ.माणिकराव साळुंखे यांनी केले.
डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे म्हणाले, ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची उद्दीष्टे गाठण्यासाठी प्राध्यापक वर्गाचे प्रशिक्षण मोठया प्रमाणावर होणे आवश्यक आहे. त्यात अशा प्रशिक्षण वर्गाचा उपयोग होतो ‘.
डॉ. सचिन वेर्णेकर म्हणाले, ‘ प्रशिक्षणातून स्वतःला अद्ययावत ठेवण्यासाठी हाच काळ योग्य असून त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर गुणवत्ता वाढण्यास मदत होईल. डॉ. श्याम शुक्ला यांनी स्वागत केले.डॉ. बलजित कौर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रमोद पवार, प्रा. दीपक नवलगुंद, डॉ.आर. व्ही. महाडिक, डॉ. स्वाती देसाई, डॉ. बलजित कौर, डॉ. भारती जाधव, डॉ.रणप्रित कौर, डॉ. सोनाली खुर्जेकर यांनी संयोजन केले.
