Friday, May 29, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

ओबीसी आरक्षणाकरीता 3 जूनला भाजपा ओबीसी मोर्चाचे ‘बोंबाबोंब आंदोलन’

पुणे : महाविकास आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत केलेल्या हलगर्जीपणाच्या विरोधात भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पुणे शहरतर्फे बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार आहे. गुरुवार दि.  ३ जून रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन होणार असल्याची माहिती भाजपा ओबीसी मोर्चा पुणे शहरचे अध्यक्ष योगेश पिंगळे यांनी दिली.
ग्रामपंचायत, जिल्हापरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना मिळणा-या अतिरिक्त राजकीय आरक्षणासंदर्भातील ठाकरे सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे ओबीसींना मिळणारे अतिरिक्त राजकीय आरक्षण संपुष्टात आले. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर देखील महाविकास आघाडी सरकार बाजू मांडण्यास अपयशी ठरले असून ओबीसी आरक्षणाबाबतही तीच स्थिती झाली आहे.

योगेश पिंगळे म्हणाले, ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन काही नेतेमंडळी महाराष्ट्रातील जनतेची धूळफेक करीत आहेत. मात्र, ओबीसी समाज त्यांच्या या धोरणांना चांगलेच ओळखून आहे. त्यामुळे आता यापुढे ओबीसी समाज शांत बसणार नाही. महाविकास आघाडी, ठाकरे सरकारने जनतेची दिशाभूल केली असून त्याविरोधात भाजपा पुणे शहर ओबीसी मोर्चा बोंबाबोंब करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading