Monday, June 15, 2026
Latest NewsPUNE

रिक्षा चालकांना मोफत PUC वाटप

पुणे – राष्ट्रीय समाज पक्ष पुणे शहराच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त रिक्षाचालकांसाठी मोफत पी.यु.सी अध्यक्ष विनायक रुपनवर यांच्या वतीने काढून देण्यात देण्यात आल्या.
सोमवारी सकाळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यात आले
यावेळी राज्यमंत्री दत्ता भरणे उपस्थित होते.
त्यांनी देखील यावेळी रिक्षाचालकांना देण्यात आलेल्या मोफत पी.यु.सी वाटपाची पाहणी केली व कामाचे कौतुक केले.

आज सकाळपासून मोफत रिक्षाचालकांसाठी पी. यु. सी काढून देण्याचे काम सुरू झाले
मोफत रिक्षाचालकांसाठी पी.यु.सी .उदघाटन बापु भावे, अध्यक्ष रिक्षा फेडरेशन यांच्या हस्ते करण्यात आले
सुमारे सातशे रिक्षाचालकांनी याचा लाभ घेतला
यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष पुणे शहर अध्यक्ष विनायक रुपनवर , ज्येष्ठ नेते बाळासाहेब कोकरे, पुणे शहर संपर्कप्रमुख अंकुश देवडकर , उपाध्यक्ष बालाजी पवार, महिला उपाध्यक्ष सुनीता किरवे, कायदे सचिव राजेश लवटे ,सल्लागार ऍड. बापूसाहेब डोबाले ,ऍड. संजय माने, श्रद्धा कदम, महादेव देवडकर , पिंटू केरुले, आण्णा अनुसे, नामदेव सुले आदी उपस्थित होते

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading