पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये लसीकरणात राजकीय हस्तक्षेप थांबविण्याची मागणी
पुणे – कॅन्टोन्मेंट भागातील लसीकरणात होणारा राजकीय हस्तक्षेप , नागरिकांना येणाऱ्या अडचणी याबाबत विविध सामाजिक संस्था व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांतर्फे पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार यांना निवेदन देण्यात आले.यावेळेस शहर काँग्रेसचे सरचिटणीस संजय कवडे, कर्तव्य फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे, राष्ट्रवादीचे कॅन्टोन्मेंट कार्याध्यक्ष निलेश कणसे,राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिरीष आगुरेड्डी व हिंदवी स्वराज्य संघाचे मोहन नारायणे आदी उपस्थित होते.
पुणे कॅन्टोन्मेंट भागात चार लसीकरण केंद्रे सुरू असून त्यामध्ये राजकीय पक्षांकडून मोठ्याप्रमाणात हस्तक्षेप होत आहे त्यावर आवर घालावा, नवीन केंद्रे ऑनलाईन करावीत,प्रत्येक केंद्रावर पोलीस संरक्षण घ्यावे ,नागरिकांना उपलब्ध लसींची पूर्व सूचना द्यावी आदी विषयांवर मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा केली त्यावर या मागण्या पूर्ण करण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
