Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

कोरोना – रविवारी राज्यात १८ हजार ६०० नवीन रुग्ण, ४०२ जणांचा मृत्यू

मुंबई – आज राज्यात १८ हजार ६०० नव्या कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५७ लाख ३१ हजार ८१५ झाली असून अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २ लाख ७१ हजार ८०१ वर पोहोचली आहे. तसेच ४०२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे सध्या राज्यातील मृत्यूदर १.६५ टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत ९४ हजार ८४४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत चढ-उतार होत असतानाच समाधानकारक बाब म्हणजे राज्यात रुग्ण मोठ्या प्रमाणात बरेही होत आहे. आज २२ हजार ५३२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ५३,६२,३७० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.५५ टक्के एवढे झाले आहे.

राज्यात आज ४०२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत ९४ हजार ८४४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,४८,६१,६०८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५७,३१,८१५ (१६.४४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १९,९८,९७६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून १२,९८१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

पुणे शहर अपडेट

  • दिवसभरात ४८६ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात ८८७ रुग्णांना डिस्चार्ज.
  • पुण्यात करोनाबाधीत २७ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०९.
  • ९५४ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
  • पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४६९७४७.
  • पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ६६१५.
  • एकूण मृत्यू -८२३२.
    -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४५४९००.
  • आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ७४२३.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading