आयपीएल – उर्वरित सामने आता संयुक्त अरब अमिरात खेळले जाणार
मुंबई, दि. 29 : कोरोनाच्या संसर्गामुळे तात्पुरती स्थगित करण्या आलेली चौदाव्या मोसमातील आयपीएलची स्पर्धा आता पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. आयपीएलमधील उर्वरित सामने आता संयुक्त अरब अमिरात अर्थात यूएईमध्ये खेळले जाणार आहेत. बीसीसीआयच्या आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या बैठक हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी वृत्त संस्थेला दिली.
आयपीएलच्या चौदाव्या मोसमाची सुरुवात 9 एप्रिलपासून झाली होती. सुमारे 25 दिवस ही स्पर्धा झाल्यानंतर कोरोना संसर्गामुळे स्पर्ध तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे उर्वरीत 31 सामने कधी खेळवले जाणार किंवा यंदाचे आयपीएल अर्धवट राहणार? याबाबत उत्सुकता होती. आज बीसीसीआयने आयपीएल चौदाव्या मोसमासाठी एक बैठक बोलावली. त्यात आयपीएलमधील उर्वरित सामने खेळवण्यासाठी यूएईची निवड करण्यात आली. दरम्यान मागील वर्षी देखील आयपीएलचे सामने यूएईमध्येच खेळवण्यात आले होते.
