कोरोना – राज्यात आज २१ हजार २७३ नवीन रुग्ण; ४२५ जणांचा मृत्यू
मुंबई – मागील २४ तासांत राज्यात २१ हजार २७३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४२५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५६ लाख ७२ हजार १८०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ९२ हजार २२५ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्के पार झाले आहे.
आज दिवसभरात ३४ हजार ३७० रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण ५२ लाख ७६ हजार २०३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.०३ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६३ टक्के एवढा आहे. राज्यात अजूनही ३ लाख १ हजार ४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ४० लाख ८६ हजार ११० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५६ लाख ७२ हजार १८० (१६.६४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २२ लाख १८ हजार २७८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १९ हजार ९९६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज मुंबईत १ हजार २६६ नव्या रुग्णांची वाढ झाली असून ३६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ८५५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईतील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख २ हजार ५३२वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १४ हजार ७७८ जणांचा मृत्यू झाला असून ६ लाख ५७ हजार ३०१ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
पुणे शहर अपडेट्स
- दिवसभरात ५८८ पाॅझिटिव्ह रुग्णांची वाढ.
- दिवसभरात ९२१ रुग्णांना डिस्चार्ज.
- पुण्यात करोनाबाधीत ३३ रुग्णांचा मृत्यू. त्यातील ११ मृत्यू पुण्याबाहेरील.
- ९९६ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
- पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४६८१२९.
- पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ७९९०.
- एकूण मृत्यू -८१४८.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४५१९९१. - आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ८१९३.
