बेघर, गरजू आणि गरीब लोकांना अन्नाचे वाटप
पुणे – कोरोना पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे, कडकडीत बंद असल्याने हॉटेल बंद, तसेच नागरिकांना घरातून बाहेर पडता येत नसल्याने रस्त्यांवरील बेघर लोक, भिक्षा मागून उदरनिर्वाह करणाऱ्या तसेच गरीब आणि बेघर लोकांची परवड होत असल्याचे भीषण चित्र उभे ठाकले असल्याचे माधवी घोष यांच्या नजरेस पडले. सामाजिक बांधिलकी जपत माधवी घोष व अनिरुद्ध घोष या मायलेकरांनी भुकेलेल्या जीवांना पोटभर अन्न खावू घालून त्यांना मायेचा आधार दिला.
पुण्यातील विविध भागात गेल्या अनेक दिवसांपासून माधवी घोष या भुकेलेल्या लोकांना अन्नदान करत आहे. प्रत्येक शनिवारी व रविवारी शिजवलेले अन्नाचे पॅकेट हजारो गरजू लोकांनापर्यंत त्या पोहचवत आहेत. या त्यांच्या कार्याला आरबीजी ग्रुप सह्याद्री जल, अंजना मस्कारेन्हास आणि दिवा किव्न यांनी मदतीचा हात दिला असून त्याच बरोबर यश येमूल, आशुतोष भुजबळ, ओमकार जाधव, ओमकार नगरकर, भावे के यांनी या कार्यास मोलाची साथ दिली. या महामारीच्या काळात गरीब व रत्यावर राहणाऱ्या लोकांची अन्नासाठी वणवण होवून त्यांची उपासमार होत असल्याने जास्तजास्त गरुजू लोकांना अन्नदान करणार असल्याचे माधवी घोष यांनी सांगितले. या कठीण काळात रत्यावर पोट भरणाऱ्या लोकांना जास्तीजात लोकांनी मदत करावी या उद्धेशाने त्यांनी “हॅप्पीटूसर्व” हा उपक्रम हाती घेतला आहे. सामाजीतील दानशूर नागरिकांनी पुढे येवून या गरजू लोकांना मदत करावी असे आवाहन घोष यांनी केले आहे.
