कोरोना – राज्यात आज 24 हजार 752 नवीन रुग्ण
मुंबई – राज्यात आज 24,752 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 23,065 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 453 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच आता एकूण 3,15,042 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आजपर्यंत एकूण 52,41,833 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.
दरम्यान, मुंबई आणि पुणे शहरात कोरोनाने कहर केला होता. मात्र आता या दोन महत्वाच्या शहरांमधील कोरोना नियंत्रणात आला आहे. मुंबईत मागील 24 तासात 1,362 रुग्णांचे निदान झाले आहे. तर 1,021 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत मुंबई 6 लाख 56 हजार 446 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईतील रिकव्हरी रेट 94 टक्क्यांवर आला आहे तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 348 दिवसांवर गेला आहे. मुंबईत सध्या 27,943 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
तसेच पुणे शहरात आज नव्याने 683 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता 4 लाख 67 हजार 541 इतकी झाली आहे. शहरातील 1 हजार 158 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 51 हजार 70 झाली आहे.
