Thursday, September 3, 2026
TECHNOLOGY

‘वी’चे गिगानेट महाराष्ट्राच्या सर्वात वेगवान ४जी नेटवर्कसह नागरिकांना कनेक्टेड ठेवते   

पुणे,-   ब्रॉडबँड टेस्टींग आणि वेबवर आधारीत नेटवर्क डायग्नोस्टिक ऍप्लिकेशन्समधील जागतिक पातळीवरील अग्रेसर ओकला®ने सत्यापित केले आहे कीवीचे गिगानेट हे सलग तिसऱ्या तिमाहीत देखील भारतभरातील सर्वात वेगवान ४जी नेटवर्क आहे. जानेवारी ते मार्च २०२१ या तिमाहीत वीने इतर सर्व ऑपरेटर्सच्या तुलनेत सर्वाधिक वेगवान ४जी स्पीड्स दिलेम्हणूनच वी ही सलग तीन तिमाहींमध्ये संपूर्ण देशभरातील सर्वाधिक वेगवान ४जी देणारी एकमेव नेटवर्क ऑपरेटर कंपनी आहे.

महाराष्ट्रात मुंबईनवी मुंबई पुणेनागपूरऔरंगाबादधुळेलातूरसोलापूरसांगलीवर्धा या महत्त्वाच्या शहरांमध्ये वीचे गिगानेट हे सरासरी डाउनलोड वेगांच्या स्पीड चार्ट्समध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.  सर्वाधिक वेगवान ४जी नेटवर्कचे सत्यापन हे २०२० च्या तिसऱ्या तिमाहीपासून २०२१ च्या पहिल्या तिमाहीपर्यंत भारत आणि विशिष्ट क्षेत्रे किंवा शहरांमधील सरासरी डाउनलोड स्पीड्ससाठी ओकला®ने केलेल्या स्पीडटेस्ट इंटेलिजन्स® डेटाच्या विश्लेषणावर आधारित आहे.

भारतात सर्वात मोठा स्पेक्ट्रम पोर्टफोलियोउपयोगात आणले जाणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान व ४जी साठी स्पेक्ट्रमचे श्रेणीसुधारण यांच्यासह वीने गेल्या दोन वर्षात आपल्या नेटवर्क क्षमता व स्पीड यांच्यात दुपटीने वाढ केली आहे.  जानेवारी ते मार्च २०२१ तिमाहीसाठी ओकलाने नुकत्याच केलेल्या सत्यापनामागे घरून काम करावे लागत असल्यामुळे डेटा वापरामध्ये झालेल्या लक्षणीय वाढीची पार्श्वभूमी आहे.

या कामगिरीबाबत वोडाफोन आयडिया लिमिटेडचे एमडी व सीईओ श्री रविंदर ठक्कर यांनी सांगितले, “२०२०-२१ मध्ये जेव्हा लोक आणि व्यवसाय संपूर्णपणे टेलिकॉम कनेक्टिविटीवर अवलंबून होते तेव्हा बहुतांश कालावधीमध्ये सर्वाधिक वेगवान ४जी नेटवर्क म्हणून वी ला रेटिंग मिळाले ही बाब अतिशय समाधानदायक आहे. या वर्षभरात डेटाचा वापर कैक पटींनी वाढलात्यामुळे टेलिकॉम नेटवर्क्सवरील ताण प्रचंड प्रमाणात वाढलात्यावेळी आम्ही आमच्या नेटवर्क क्षमतांमध्ये लक्षणीय सुधारणा घडवून आणल्या.  आमच्या ग्राहकांना सर्वोत्कृष्ट नेटवर्क अनुभव मिळावा आणि त्यांना कायम आघाडीवर राहून यश संपादन करता यावे यासाठी आमच्या नेटवर्क योद्ध्यांनी लॉकडाउन व सोशल डिस्टंसिंग नियमांची आव्हाने यशस्वीपणे पेलली.”   

काळाची पावले ओळखून वीने ग्राहकांसाठी विविध सेवा सहजपणे उपलब्ध होतील अशी व्यवस्था केली आहे.  वापररिचार्जतपशीलवार बिल आणि सेवांचे ऍक्टिव्हेशन या सेवा २४X७ पुरवल्या जात आहेत.  ग्राहकांना घरबसल्या आपल्या या गरजा पूर्ण करून घेता येतात.  वीने आपल्या ग्राहकांसाठी वी.आय.सी. – एआय चालित व्हर्च्युअल असिस्टंट व डिजिटल सेवा सादर केली आहे.  वी वेबसाईटवी ऍप व व्हाट्सऍपवर अँड्रॉइड तसेच आयओएस युजर्स या सेवेचा लाभ घेऊ शकतात.  व्हाट्सऍपवर वी ग्राहक पोस्टपेड बिले भरू शकतातप्रीपेड रिचार्ज करू शकतात आणि इतरही अनेक सुविधा त्यांना याठिकाणी उपलब्ध होतात.

डेटाचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर करणारे वी नेटवर्कवरील ग्राहक रात्री बारा ते सकाळी सहा या वेळेत अमर्याद हाय स्पीड डेटाचा आनंद घेऊ शकतात. हा लाभ २४९ रुपये व त्यापेक्षा जास्त किमतीच्या अनलिमिटेड प्लॅन्सवर सर्व वी प्रीपेड ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. २४९ रुपये आणि त्यापेक्षा जास्त किमतीच्या सर्व अनलिमिटेड पॅक्सवर वीकएंड डेटा रोलओव्हरचे लाभ देखील वी ग्राहकांना मिळतात.  यामुळे युजर्सना त्यांच्या सोमवार ते शुक्रवार कोट्यामधील न वापरलेला डेटा पुढे नेऊन शनिवारी आणि रविवारी वापरता येतो.

विमा संरक्षण न घेतलेल्या किंवा गरजेपेक्षा कमी विमा संरक्षण घेतलेल्या व्यक्तींसाठी वीने आदित्य बिर्ला हेल्थ इन्श्युरन्ससोबत भागीदारी करत ५१ रुपयांपासून पुढच्या मासिक रिचार्जसोबत हॉस्पिटलायझेशन इन्श्युरन्स कव्हर योजना सुरु केली आहे.  यामध्ये वी युजर्सना दर दिवशीच्या हॉस्पिटलायझेशनसाठी १००० रुपयांपर्यंतची आणि आयसीयु खर्चांसाठी २००० रुपये निश्चित रक्कम मिळते.  या योजनेमध्ये इतर आजारांबरोबरीने कोविड-१९ च्याही हॉस्पिटलायझेशनचा समावेश करण्यात येतो.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading