Saturday, May 30, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

कोरोना – राज्यात मंगळवारी २४ हजार १३६ नवीन रुग्ण; एकूण मृतांची संख्या ९० हजारच्या पुढे

मुंबई –  राज्यात गेल्या २४ तासांत २४ हजार १३६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ६०१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५२ लाख १८ हजार ७६८वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ९० हजार ३४९ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील सध्याचा मृत्यूदर १.६१ टक्क्यांवर पोहोचला आहे.

आज दिवसभरात राज्यातील ३६ हजार १७६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ५२ लाख १८ हजार ७६८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.७६ टक्के झाले आहे. सध्या राज्यात ३ लाख १४ हजार ३६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ३५ लाख ४१ हजार ५६५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५६ लाख २६ हजार १५५ (१६.७७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २६ लाख १६ हजार ४२८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २० हजार ८२९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

दरम्यान मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार ३७ नव्या रुग्णांची वाढ झाली असून ३७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. तर १ हजार ४२७ जण रुग्ण बरे होऊन घरी गेले. मुंबईतील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६ लाख ९९ लाख ९०४वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १४ हजार ७०८ जणांचा मृत्यू झाला असून ६ लाख ५५ हजार ४२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

पुणे शहर अपडेट

  • दिवसभरात ७३९ पाॅझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात १५६० रुग्णांना डिस्चार्ज.
  • पुण्यात करोनाबाधीत ४९ रुग्णांचा मृत्यू. १४ रूग्ण पुण्याबाहेरील.
  • १०३२ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
  • पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४६६८५८.
  • पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ८८६८.
  • एकूण मृत्यू -८०७८.
    -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४४९९१२.
  • आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ७७३७.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading