fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsPUNE

सावली संस्थेत झाले ज्येष्ठ मतीमंद मुलांचे लसीकरण

पुणे – सावली संस्थेच्या मतीमंद आणि विशेष मुलांचे लसीकरण आज नुकतेच सावली संस्थेत पार पडले. या वेळी विशेष मुलांना लस देण्यात आली. बुद्धी असून शारिरीक परावलंबत्व आणि न बोलता येणा-या या मुलांसाठी लसीकरण ही एक वेगळीच गोष्ट होती. सेरेब्रल पाल्सी, आत्ममग्न आणि बहुविकलांग मुलांना लस देणे, हे खूप जिकरीचे काम असल्याचं डॉ.संपदा यांनी सांगितलं. तर आमच्यासाठी हा क्षण खूप टिपण्यासारखा असल्याचं नर्स सविता पवार आणि राणी कांबळे यांनी सांगितलं. सर्वसामान्य माणूस आणि विशेष मुले यांमधला फरक ही लस देताना जाणवल्याचं सावलीचे सर्वेसर्वा वसंत ठकार यांनी सांगितलं. प्रत्येक मुलाचे मानसिक आणि शारिरीक प्रश्न वेगळे असून त्यांचे लसीकरण करणे ही काळाची गरज आहे. जेणेकरुन भविष्यात या मुलांना कोरोनाची लागण होऊ नये आणि उर्वरित आयुष्य सुखाचे होवो, हा यामागचा उद्देश आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading