‘पतंजली’ डेअरी व्यवसाय प्रमुख सुनील बन्सल यांचे करोनामुळे निधन
नवी दिल्ली – योगगुरु बाबा रामदेव यांच्या पंतजली डेअरी व्यवसायाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील बन्सल यांचे करोनामुळे निधन झाले आहे. मृत्यूसमयी ते ५७ वर्षांचे होते. करोनाचा संसर्ग फुफ्फुसापर्यंत पोहचला असल्याकारणाने बन्सल यांची प्रकृती खालावली होती. यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांना व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांना ‘ब्रेन हॅमरेज’ झाला आणि त्यामध्येच त्यांची प्राणज्योत मालावली.
सुनिल बन्सल यांच्या निधनाची बातमी त्यांच्या नातेवाईकांकडून देण्यात आली आहे. याविषयी माहिती देताना गेल्या काही दिवसांपासून त्यांना व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. परंतु, त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही आणि अखेर त्यांचा मृत्यू झाला.
Sunil Bansal, CEO of Baba Ramdev’s Patanjali Dairies, dies of ‘Covid complications’@ChandnaHimani reports for ThePrinthttps://t.co/BjDfuKsiX5
— Shekhar Gupta (@ShekharGupta) May 23, 2021
सुनिल बन्सल यांनी २०१८ मध्ये पतंजली आयुर्वेदच्या डेअरी व्यवसायाची सूत्रं हाती घेतली होती. ते ‘पतंजली’च्या डेअरी व्यवसायाचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यांच्या अचानक जाण्याने पतंजली समुहामधून दु:ख व्यक्त केले जात आहे.
