Monday, June 22, 2026
Latest NewsPUNE

फार्मा कंपन्यांनी तंत्रज्ञानाची कास धरावी अच्यूत गोडबोले यांचे मत

पुणे, दि.२४ – “आधुनिक काळात सर्व क्षेत्रातील कंपन्यांनी तंत्रज्ञानाची कास धरली आहे. त्यातून फार्मा कंपन्यांना वेगळे करता येणार नाही. मशीन लर्नींग, डीप लर्नींग, आर्टीफिशिल लर्नींग, थ्री डी प्रिंटिंग, इंडस्ट्री ४.० सारख्या नव्या तंत्रज्ञानाच्या जोरावरच सर्वच क्षेत्रात प्रगती होतांना दिसत आहे. या बरोबरच फार्मा कंपन्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा.” असे विचार सुप्रसिद्ध तंत्रज्ञ, लेखक व  वक्ते अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ फार्मसीच्या वतीने आयोजित ऑनलाईन ‘फिनिशिंग स्कूल २०२०-२१’ या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित हा कार्यक्रम ५ जून पर्यंत चालेल. जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार प्रा.डॉ.व्हिसेंटी रोडिला अलमा हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.
 यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. एन.टी.राव, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, स्कूल ऑफ फार्मसीचे अधिष्ठाता डॉ. ज्ञानेश लिमये आणि प्रा.अक्षय बाहेती हे उपस्थित होते.

अच्युत गोडबोले म्हणाले,“ कोणत्याही क्षेत्रात कार्य करतांना टीम वर्क हे गरजेचे आहे. त्याच प्रमाणे उत्तम संवाद साधण्याची कला, ऐकण्याची कला अंगी आणावी. ज्याला आपण सामाजिक कौशल्य असे संबोधू शकतो. फार्मा कंपन्यामध्ये सध्या देशातील १५ टक्के लोक कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान शिकणे गरजेचे आहे. सतत शिक्षण्याची प्रवृत्ती ठेवावी. सध्या संर्व फार्मा कंपन्यांनी डीप लर्नींग आणि आर्टििफिशिल इंटेलिजेंटचा वापर मोठ्या प्रमाणात करतांना दिसत आहेत. जे तंत्रज्ञानाची कास धरून कार्य करीत आहेत. त्यांनी उत्पादन क्षमतेतही बदल केले आहे. देशात संगणाचा विकास होतांना संपूर्ण तंत्रज्ञान तुमच्या हातात आले आहे. एकीकडे चीन सारख्या देशात संपूर्ण व्यवहाराबरोबरच बॅकिंग व्यवहार ही तंत्रज्ञानावर आधारित आहेत. तसेच कित्येक देशांमध्ये डीप लर्नींगच्या माध्यमातून अनुवादाचे कार्य ही मोठ्या प्रमाणात होतात. अशा वेळेस विद्यार्थ्यांनी आधुनिक व नवे तंत्रज्ञान आत्मसात करून देशाच्या प्रगतीत हातभार लावावा.” प्रा. पोर्णिमा बागची यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. अनिरूद्ध चाबुकस्वार यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading