मीशोची नवी ब्रँड मोहीम सादर
पुणे: मीशो या लाँगटेल प्रोडक्ट्सच्या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन बाजारपेठेने या व्यासपीठावर वितरकांना सहज व्यवसाय करता येईल याबद्दल जागरुकता निर्माण करणारी नवी ब्रँड मोहीम आज सादर केली. या नव्या स्वरुपात फक्त एक टक्का इतके कमी कमिशन मीशोतर्फे आकारले जाणार आहे. वितरकांना फक्त या व्यासपीठावर नोंदणी करायची आहे आणि त्यांची उत्पादने लिस्टमध्ये टाकायची आहेत.
व्यावसायिकांनी सोशल मीडियावर त्यांची उत्पादने शेअर केली की ऑर्डर्सचा ओघच सुरू होतो. सर्व आकारातील वितरकांबद्दल मीशोने बाळगलेली बांधिलकी या मोहिमेत अधोरेखित करण्यात आली आहे. या व्यासपीठावर उत्पादनाला खात्रीशीर मिळणारी दृश्यात्मकता, ७00 हून अधिक विभागांमध्ये एक कोटींहून अधिक रीसेलर्सचा संपर्क आणि शिपिंगचा सगळ्यात कमी दर यासह या व्यासपीठावर वितरकांना आपला व्यवसाय वाढवण्याच्या मुबलक संधी निर्माण होतात.
मीशोचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विदित अत्रे यावेळी म्हणाले की ऑनलाइन व्यवसाय करताना छोट्या उद्योगांना येणाऱ्या अडचणींची मीशोमध्ये आम्हाला कल्पना आहे. उत्पादनांचे लिस्टिंग ते लॉजिस्टिक आणि पेमेंट्स हाताळणे असे अनेक मुद्दे यात असतात. या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही एमएसएमईजना त्यांची विक्री वृद्धिंगत करून व्यवसाय वाढवण्यात डिजिटल माध्यमांच्या वैशिष्ट्यांचा लाभ घेण्याची कल्पना मांडू पाहत आहोत. ऑनलाइन विक्री करणे आणि प्रचंड कमिशनची चिंता न करताना सहजतेने व्यवसाय सुरू करण्यापासून ते फक्त एक पाऊल दूर आहेत.”
