Saturday, May 30, 2026
BusinessLatest News

आदित्य बिर्ला सन लाइफ इन्शुरन्स तर्फे व्हिजन लाइफइन्कम प्लस योजना सादर

पुणे – आदित्य बिर्ला सन लाइफ इन्शुरन्स  (एबीएसएलआय) या आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड च्या (एबीसीएल) आयुर्विमा क्षेत्रातील सहाय्यक कंपनीने निश्चित नियमित उत्पन्न देणारी एबीएसएलआय व्हिजन लाइफइन्कम प्लस योजना  सुरू करीत असल्याची घोषणा केली आहे. ही एक लवचिक स्वरुपाची बचत योजना असून ती नियमित उत्पन्नाखेरीज बोनसची रक्कम लवचिक पद्धतीने देते.

ग्राहकांच्या जीवनातील विविध टप्प्यांमध्ये त्यांच्या वेगवेगळ्या आर्थिक गरजांची पूर्तता करण्यात योग्य ठरतील, असे विविध पर्याय उपलब्ध करण्याच्या दृष्टीने ही नॉन-लिंक्ड , पार्टिसिपेटिंग , वैयक्तिक योजना बनविण्यात आली आहे. आयुर्विमा संरक्षणाचे व्यापक फायदे ग्राहकांना देताना, त्यांच्या आयुष्यातील वाढती आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी 30 वर्षांपर्यंत नियमित उत्पन्नाची हमी ही बचत योजना मिळवून देते. याव्यतिरिक्तया योजनेत बोनसची रक्कम संपूर्णपणे लवचिक स्वरुपात देण्याचे वैशिष्ट्य समाविष्ट आहे. ही रक्कम संपत्ती निर्माण करण्यासाठी जमा केली जाऊ शकते किंवा तातडीची गरज भागविण्यासाठी ग्राहकांना ती सोयीस्करपणे काढून घेता येते.

एबीएसएलआय व्हिजन लाइफइन्कम प्लस  योजनेमुळे ग्राहकांना आयुष्यभर निश्चितपणे अतिरिक्त, करमुक्त उत्पन्न मिळत राहते, तसेच कोणत्याही वेळी हातात रोख रक्कम मिळण्याची तरतूदही यात आहे.

या योजनेविषयी माहिती देताना आदित्य बिर्ला सनलाइफ इन्शुरन्स चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी कमलेश राव म्हणाले, कोविड साथीमुळे निर्माण झालेली अस्थिरता, अर्थव्यवस्था व बाजारपेठेतील चढउतार, यांच्या पार्श्वभूमीवरउद्यासाठी किंवा आजपासून तीन दशकांच्या कालावधीसाठी बचत करून ठेवणे हे सध्या प्रत्येकालाच अत्यावश्यक झाले आहे. आपल्या वैयक्तिक जीवनासाठी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वैयक्तिकृत करता येतील आणि भविष्यातील आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ण सुरक्षिततेचे आश्वासन देऊ शकतील, अशा योजनांची आज सर्वांना आवश्यकता आहे. एबीएसएलआय व्हिजन लाइफइन्कम प्लस  योजना ग्राहकांचे उत्पन्न वाढवून व जोखीम कमी करून त्यांची ही तातडीची गरज पूर्ण करेल. या सर्वांगीण उपायातून लोकांच्या अल्प आणि दीर्घ मुदतीच्या आर्थिक गरजा पूर्ण होतील, त्यांना आर्थिक नियोजन व्यवस्थित करता येईल, तसेच संपत्ती वाढविण्यासाठी किंवा आकस्मिक निधी तयार करण्यासाठी यातील बोनसच्या माध्यमातून पैसे मिळू शकतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading