Thursday, September 3, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

म्युकरमायकोसिस रुग्णांना मिळणार मोफत उपचार – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई – राज्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढत असताना राज्य सरकारने एक मोठा दिलासा दिला आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर अनेक रुग्णांना म्युकरमायकोसिस झाला आहे. ही संख्या दररोज वाढत आहे. राज्यातील म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर सरकार मोफत उपचार करणार अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी केली आहे.

– ज्यांच्या जवळ कुठलंही रेशन कार्ड आहे त्यांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेत या आजारवर उपचाराचा लाभ दिला जाणार आहे.
– महात्मा फुले जनआरोग्य अंतर्गत १००० हॉस्पिटलमध्ये यावर चांगल्या प्रकारे उपचार होतील, तसंच शासकीय रुग्णालयात होईल.
– महात्मा फुले जनआरोग्य योजनेत दीड लाख पर्यंत उपचार होतात, शासन मात्र या आजारवर सगळा खर्च करणार आहे.
– या आजारवरील सर्व औषधे, इजेक्शन मोफत दिले जाणार आहे.

म्युकरमायकोसिससाठी अम्पोटेरेफीन हे इंजेक्शन लागतं. सध्या दीड ते दोन लाख इंजेक्शनची गरज असून याबाबत ऑर्डर दिली आहे, पण केंद्र सरकारकडे वितरणाचे अधिकार आहे. पंतप्रधानांकडे या इजेक्शनबाबत व्हीसीद्वारे हा मुद्दा मांडणार आहोत. असं देखील आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading