Saturday, June 13, 2026
BusinessLatest News

सर्वाधिक तिमाही आणि वार्षिक नफा मिळवण्याचा विक्रम शक्ति पंप्सच्या नावे

पुणे: शक्ति पंप्स (इंडिया) लिमिटेड ने चौथी तिमाही तसेच आर्थिक वर्ष २०२१ मध्ये निरंतर वाढीसह उत्कृष्ट कामगिरी दाखविली आहे.२०२०-२१ कंपनीच्या एकुण चौथी तीमाहीत  कंपनीची एकुण कमाई जानेवारी ते मार्च २०२१ दरम्यान ३२१.११कोटी आहे.यातच आर्थिक वर्ष २०२० मध्ये ९३.७८ कोटी होती.कंपनीने आता पर्यंत सर्वांधिक वार्षिक ईबीआइटीडीए ५१.३५ कोटींची नोंदणी केली आहे.तुलनेने वार्षिक आर्थिक वर्ष २०२० मध्ये १. ४१ कोटी होते.

कंपनीने तिचा सर्वाधिक तिमाही नफा नोंदविला आहे.वार्षिक आर्थिक वर्ष २०२१ मध्ये कंपनीचा निव्वळ नफा ३०.५० कोटी आहे तर तुलनेने आर्थिक वर्ष २०२० मध्ये ६.१५ कोटी चे नुकसान झाले आहे.

वर्ष २०२०-२१ मध्ये कंपनीच्या कामकाजाचा महसूल ९३३.४३ कोटी आहे.तुलनेने वार्षिक वर्ष २०२० मध्ये ३८६.९१ कोटी होते.तसेच२०२०-२१इबीआइडीटीए १४५.८२ कोटी आहे.तुलनेने आर्थिक वर्ष २०२० मध्ये १६.३३ होते. या कालावधीत कंपनीला ७५.५९ कोटी नफा झाला.तुलनेने आर्थिक वर्ष २०२० मध्ये १४.०८ कोटीचे नुकसान झाले.

या निकालावर भाष्य करताना अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश पाटीदार म्हणाले की,”आमच्या घरगुती सौर पंप्स बाजारपेठेतील मजबूत वाढ झाल्यामुळे चांगली आर्थिक कामगिरी जाहीर करण्यात आनंद झाला आहे.पीएम- कुसुम योजनेने आमच्या वाढीसाठी योगदान दिले आहे.या योजने अंतर्गत मोठ्या प्रमाणात क्षमता आहे .कारण शेतकऱ्यांसाठी डिझेल पंप्स अव्यवहार्य आहेत आणि विद्युत पंपांना मर्यादा आहेत.आमच्या योजनेअंतर्गत शेतक-यांना अधिक पंप्स पुरविण्याची अपेक्षा आहे.”

पुढे ते म्हणाले की, पंतप्रधान कुसुम योजना चांगली कामगिरी करीत आहेत.अमंलबजावणिच्या पहिल्या वर्षात २०२०-२१ आर्थिक वर्षासाठी देशभरात ५०.००० सौर कृषी पंप्स बसविण्यात आले आहेत.समोर १.८० लाख सौर पंप्स बसविले आहे. या योजनेंतर्गत आम्ही १५,००० सौर पंप्स बसवले आहेत चालु आर्थिक वर्षात आम्ही अधिक मागणीची अपेक्षा करीत आहोत आणि शेतक-यांमध्ये जागरूकता वाढत जाईल यासाठी आम्ही पुढे जात आहोत.दुसऱ्या वर्षासाठी शासनाचे लक्ष्य ३.२० लाख शेती सौर पंप्स असुन तेथुनच आपली वाढ दिसून येत आहे, चालु आर्थिक वर्ष देखील. ते पुढे म्हणाले की, कंपनीने १० रुपये प्रति मूल्याच्या किंमतीवर ८० टक्के म्हणजेच ८ रुपये प्रति शेअर लाभांश देण्याची शिफारस केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading