दिलासादायक – राज्यात सोमवारी २६ हजार ६१६ नवीन कोरोना रुग्ण; ५१६ जणांचा मृत्यू
मुंबई – राज्यात आजही नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात तब्बल ४८ हजार २११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर आज नवीन २६ हजार ६१६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान आज ५१६ कोरोना रुग्णांची मृत्यू झाला आहे.
त्यामुळे आता राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५४ लाख ०५ हजार ०६८ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ८२ हजार ४८६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात ४ लाख ४५ हजार ४९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज नोंद झालेल्या एकूण ५१६ मृत्यूंपैकी २८९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २२७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ४८४ ने वाढली आहे.
राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी १३ लाख ३८ हजार ४०७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५४ लाख ०५ हजार ०६८ (१७.२५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३३ लाख ७४ हजार २५७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २८ हजार १०२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
पुणे शहर अपडेट
- दिवसभरात ६८४ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
- दिवसभरात २७९० रुग्णांना डिस्चार्ज.
- पुण्यात करोनाबाधीत ६६ रुग्णांचा मृत्यू. २३ रूग्ण पुण्याबाहेरील.
- १४०२ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
- पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४५९९८७.
- पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १८४४०.
- एकूण मृत्यू -७७४९.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४३३७९८. - आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ७८६२.
