Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNE

PMP कात्रज आगारामधील बंद असलेल्या दोन मिडी बस दुरुस्त करून मार्गावर आणण्यात यश

पुणे – पीएमपीएमएलच्या कात्रज आगारामधील दोन मिडी बसेस इंजिनकाम व स्पेअरपार्ट्स अभावी बंद होत्या. मिडी बस क्रमांक ५५५ व मिडी बस क्रमांक ६८८ दीर्घकाळ बंद होत्या. सदर बस करीता लागणारे स्पेअरपार्ट्स व युनिट असेंब्ली उपलब्ध करून या बसेसची दुरुस्तीची कामे करून या दोन्ही बसेस आरटीओ पासिंग करून मार्गावर संचलनात आणण्यासाठी पीएमपीएमएलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना यश आले आहे.

पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.राजेंद्र जगताप व सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.चेतना केरुरे यांनी बंद अवस्थेत असणाऱ्या बसेस दुरुस्त करून मार्गावर आणण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. यामुळे मार्गावरील बसेसची संख्या वाढण्यास मदत होणार आहे. त्या अनुषंगाने सूचनांची अंमलबजावणी करत कात्रज आगारातील मिडी बस क्रमांक ५५५ व  मिडी बस क्रमांक ६८८ या दोन बसेसची दुरुस्तीची कामे करून मार्गावर आणण्यासाठी सज्ज करण्यात आल्या आहेत.

पीएमपीएमएलचे चिफ कोऑर्डीनेटर सुनिल बुरसे, मुख्य अभियंता अनंत वाघमारे व कैलास गावडे,भांडार अधिकारी राजेश रुपनवर यांनी सदर बसेस करीता लागणारे स्पेअरपार्ट्स व युनिट असेंब्ली उपलब्ध करून दिल्यामुळे बंद अवस्थेत असणाऱ्या दोन मिडी बसेस मार्गावर आणण्यात यश आले. कात्रज आगार व्यवस्थापक विजय रांजणे, आगार अभियंता सचिन वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्कशॉपमधील सेवकांनी सदर बसेसचे दुरुस्तीचे काम केले.
सदरच्या बंद असणाऱ्या बसेस मार्गावर आणण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप व सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.चेतना केरुरे यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading