कोरोना – राज्यात आज ४० हजार ९५६ नवीन रुग्ण; ७९३ जणांचा मृत्यू
मुंबई – राज्यात कोरोनच्या दुसऱ्या लाटेचे तीव्र पडसाद उमटले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील प्रादुर्भाव जलद होत असल्यामुळे दिवसाला मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. परंतु दिवसेंदिवस कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा वाढता आकडा हा राज्याची चिंता दर्शवणारा आहे. गेल्या २४ तासात एकुण ७९३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर २४ तासात एकुण ४० हजार ९५६ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. राज्याची वाढती आकडेवारी धडकी भरवणारी असली तरी गेल्या २४ तासात ७१ हजार ९६६ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली असल्याची दिलासादायक बाब आहे.
राज्यात एकाच दिवसात ७१,९६६ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ४५,४१,३९१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८७.६७% एवढे झाले आहे. तर ४० हजार ९५६ कोरोनाबाधितांची नव्याने भर झाली आहे. तसेच ७९३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे.
महाराष्ट्रात एकुण आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,९८,४८,७९१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५१,७९,९२९ (१७.३५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३५,९१,७८३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २९,९५५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ५,५८,९९६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.आज नोंद झालेल्या एकूण ७९३ मृत्यूंपैकी ४०३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १७० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २२० मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २२० मृत्यू, नाशिक- ४७, नागपूर- ३४, बीड- २२, नांदेड- २२, पुणे- १७, ठाणे- १४, लातूर- ११, जालना- १०, नंदूरबार- १०, अहमदनगर- ५, धुळे- ५, गडचिरोली- ४, परभणी- ४, सोलापूर- ३, उस्मानाबाद- २, रत्नागिरी- २, सांगली- २, भंडारा- १, गोंदिया- १, जळगाव- १, कोल्हापूर- १, रायगड- १ आणि पालघर- १ असे आहेत.
पुणे शहर कोरोना अपडेट्स
- दिवसभरात २४०४ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
- दिवसभरात ६६४५ रुग्णांना डिस्चार्ज.
- पुण्यात करोनाबाधीत ७६ रुग्णांचा मृत्यू. २४ रूग्ण पुण्याबाहेरील.
- १३९९ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
- पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४५०१३३.
- पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २९७०२.
- एकूण मृत्यू -७४६१.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४१२९७०. - आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ११९९६.
