Saturday, May 30, 2026
MAHARASHTRAPUNE

पोटच्या अडीच वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या बापाला जन्मठेप

पुणे, दि. ७ – पोटच्या अडीच वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापाला न्यायालयाने जन्मठेप आणि आठ हजार रूपयांचा दंडाची शिक्षा सूनवली. विशेष न्यायाधिश आर.व्ही. अदोने यांनी हा आदेश दिला.

याबाबत पीडितेच्या आईने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पतीविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपी हा मोटार चालक म्हणून काम करतो. तसेच तो 2017 मध्ये पिंपळे गुरव येथे पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलीसह रहावयास होता. आरोपीस दारू पिण्याचे व्यसन आहे. 30 नोव्हेंबर 2017 रोजी सायंकाळी साडेचार वाजता तो दारू पिउन घरी गेला. आरोपी मुलीस तु अंगणवाडीत शाळेला का गेली नाही अशी विचारणा करीत मारहाण करू लागला. फिर्यादीने त्याला अडविले असता पतीने त्यांनाही मारहाण केली. फिर्यादी घरातील स्वच्छतागृहात गेल्या असता मुलगी रडत असल्याचा आवाज आला. त्यांनी बाहेर येवून पाहिले असता पती मुलीवर लैंगिक अत्याचार करीत असल्याचे दिसले.

घडलेल्या प्रकाराबाबत कोणास काही सांगू नको. तसेच, मुलीस दवाखान्यात घेवून जायचे नाही, असे बोलून आरोपीने दोघींना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पुन्हा 6 डिसेंबर रोजी आरोपीने फिर्यादी महिलेस मारहाण करीत मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या तावडीतून सुटून तीने पोलीस ठाणे गाठले आणि आरोपीविरोधात तक्रार दाखलकेली. पोलिसांनी तत्काळ आरोपीस अटक केली. पोलीस उपनिरीक्षक मधुमती शिंदे यांनी गुन्ह्याचा तपास केला.त्यांना यायालयीन कामकाजासाठी सहायक उपनिरीक्षक राजेंद्र सोनवणे यांनी सहकार्य केले.
विशेष सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी या खटल्याचे कामकाम पाहिले. त्यांनी सात साक्षीदार तपासले. तसेच, आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading