Tuesday, June 16, 2026
MAHARASHTRAPUNETOP NEWS

कोरोना – राज्यात गुरुवारी ६२ हजार १९४ नवीन रुग्ण; ८५३ जणांचा मृत्यू

मुंबई – राज्यात गेल्या २४ तासांत ६२ हजार १९४ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात ६० हजारांखाली रुग्ण सापडत होते. मात्र, आज पुन्हा एकदा साठ हजारांचा आकडा पार केल्याने राज्यातील आरोग्य यंत्रणेचा ताण वाढला आहे.

गेल्या २४ तासांत ६२ हजार १९४ नवे रुग्ण साप़डले असून ६३ हजार ८४२ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर, आज ८५३ बाधितांच्या मृतांची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९ टक्के आहे. तर, बरे होण्याचं प्रमाण ८५.५४ टक्के आहे. आतापर्यतं ४२ लाख २७ हजार ९४० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ८६ लाख ६१ हजार ६६८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४९ लाख ४२ हजार ७३६ नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३८ लाख २६ हजार ८९ व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर, २९ हजार ४०६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइमध्ये आहेत.

दरम्यान, आज मुंबईत ३ हजार ५६ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर ३ हजार ८३८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच ६९ रुग्णांनी आपले प्राण गमावले आहे. आतापर्यंत मुंबईत ६ लाख २ हजार ३८३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर १३ हजार ६१६ बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत ५० हजार ६०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

पुणे कोरोना अपडेट

  • दिवसभरात २९०२ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात २९८६ रुग्णांना डिस्चार्ज.
  • पुण्यात करोनाबाधीत ८६ रुग्णांचा मृत्यू. २० रूग्ण पुण्याबाहेरील.
  • १४१४ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
  • पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४३९२५१.
  • पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३९५८२.
  • एकूण मृत्यू -७१८४.
    -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ३९२४८५.
  • आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १८८६२.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading