Saturday, May 30, 2026
ENTERTAINMENTMAHARASHTRA

ज्येष्ठ नाट्य नेपथ्यकार अशोक पालेकर यांचे निधन

मुंबई, दि. १ – ज्येष्ठ नेपथ्यकार अर्थात नाटकाच्या मंचावर जी कलाकृती केलेली असते तिला नेपथ्य असे म्हणतात, असे नेपथ्यकार अशोक पालेकर यांचे आज निधन झाले. गेल्या ३० वर्षाहून अधिक काळ त्यांनी हजारो नाटकांचे नेपथ्य केले ते चांगले नाट्यनिर्माते ही होते. अनेक दिग्दर्शक, नाट्यनिर्माते, कलाकारांबरोबर त्यांनी काम केले होते. माझ्या अनेक नाटकांचे नेपथ्य पालेकर यांनीच केले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ‘मार्ग युद्धाचा की बुद्धाचा’ या नाटकाचे नेपथ्य ही त्यांनीच केले होते. मी निर्मिती केलेल्या व्यावसायिक नाटकांबरोबरच बालनाट्यांचे ही नेपथ्य पालेकर यांनी केले होते. अशा हरहुन्नरी नेपथ्यकार अशोक पालेकर याचे आपल्यातून अचानक एक्झिट घेणे ही मनाला चटका लावून जाणारी बाब आहे. काही दिवसांपूर्वीच माझा बालपणीचा मित्र व नाट्य नेपथ्यकार अनंता मेस्त्री यांचे ही अल्पशा आजाराने निधन झाले होते. दोघांचे असे अचानक जाण्याने नाट्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. अशोक पालेकर यांना भावपूर्ण आदरांजली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading