Saturday, May 30, 2026
PUNETOP NEWS

पुणे स्मार्ट सिटी आणि इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल यांच्यात सामंजस्य करार

पुणे, दि. १ – महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून, पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड आणि सीआयआयच्या- इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (आयजीबीसी) पुणे शहर यांच्यामध्ये हरित इमारत चळवळ, टिकाऊ विकासाला चालना व ग्रीनिंगची सुविधा उपलब्ध करुन देणे यांसाठी सामंजस्य करार करण्यात आला.

यावेळी डॉ. संजय कोलते (भा.प्र.से.) मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे स्मार्ट सिटी म्हणाले, इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (आयजीबीसी) यांच्या सहकार्याने शहरातील शहरी हरित इमारतीवरील उपक्रमांवर लक्ष केंद्रित केले जाईल. विविध शहरांमध्ये लागू केलेल्या अभ्यास पाहणीनुसार सर्वोत्तम पद्धती आणि शहरातील हरित वैशिष्ट्यांना वर्धित करण्यासाठी, वहन विकास, जलसंधारण आणि पर्यावरणीय संवेदनशील विभाग यांसारख्या प्रमुख बाबींविषयी चर्चा केली जाईल व भविष्यात आपल्या शहराच्या विकासास मोठा हातभार लागेल. याशिवाय आयजीबीसीचे अधिकारी सक्षम भूमीचा वापर आणि शहरातील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी शिफारसी देतील ज्याचा फायदा पुणेकरांना होईल. आपल्या शहराची पायाभूत सुविधा सुधारण्याच्या मदतीसाठी आयजीबीसी टीमच्या सहकार्याची अपेक्षा आहे.

सदरच्या कार्यक्रमास पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, मुख्य ज्ञान अधिकारी अनिरुध्द शहापुरे, व कंपनी सेक्रेटरी स्वानंद शेंडे आणि इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलनचे पुणे चेप्टरचे अध्यक्ष जे. पी. श्रॉफ हे उपस्थित होते.
तसेच सदर कार्यक्रमास ऑनलाईन पध्दतीने इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलनचे अध्यक्ष व्ही. सुरेश, पुणे चेप्टरचे सह-अध्यक्ष डॉ. पूर्वा केसकर, सीआयआय पुणे विभाग अध्यक्ष दीपक गर्ग उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रणिती श्रॉफ यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading