fbpx
Thursday, April 25, 2024
MAHARASHTRANATIONALPUNETOP NEWS

धमक्यांमुळे सीरम इन्स्टिट्यूट चे आदर पुनावाला देश सोडुन गेले लंडनला

पुणे / नवी दिल्ली, दि. १ – देशात करोना रुग्णांची संख्या वाढत असताना आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सध्या सीरम इस्टिट्यूटचे अदर पुनावाला भारत देश सोडून थेट लंडनला निघून गेले आहेत.

द टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की मला धमक्या मिळत आहेत, आणि सत्य बोललो तर माझे शीर कापले जाईल, अशीही भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

सीरम इन्स्टिट्युटचे प्रमुख अदर पुनावाला यांनी भारतातील श्रीमंत आणि शक्तीशाली लोकांकडून धमक्या मिळत असल्याचं सांगितलंय. तसेच यामुळे आगामी काळात भारताबाहेर ब्रिटनमध्ये कोरोना लसीचं उत्पादन करण्याबाबत सूचक इशारा दिलाय.

ते आंतरराष्ट्रीय मॅगेझिन टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. पुनावाला जगातील सर्वात मोठे कोरोना लस उत्पादक आहेत. अदर पुनावाला यांनी म्हटलंय की, फोन कॉल ही सर्वात वाईट गोष्ट आहे. निरंतर येणारे फोन कॉल्स अत्यंत त्रासदायक आहेत.

अदर पुनावाला म्हणाले, “भारतातील सर्वात श्रीमंत आणि शक्तीशाली लोकांपैकी काही जणांकडून धमक्या येत आहेत. यात काही राज्यांचे मुख्यमंत्री, काही उद्योग समुहांचे प्रमुखांचा समावेश आहे.

हे सर्व सीरमच्या एस्ट्रा झेनेका म्हणजेच कोविशिल्ड लसीचा तातडीने पुरवठा मागत आहेत. यांना धमकी म्हणणंही कमी ठरेल. आक्रमकपणा आणि अपेक्षांचा स्तर अभूतपूर्व आहे.”

दरम्यान दोन दिवसांपूर्वीच :गृह मंत्रालयाने सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे अदार पूनावाला यांना वाय श्रेणी (Y Category) संरक्षण दिलं होत. गृह मंत्रालयाकडून या संदर्भातील आदेश जारी करण्यात आला आहे. अदार पूनावाला यांना सीआरपीएफ संरक्षण देण्यात आलं आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading