कोरोना – राज्यात ६३ हजार २८२ नवीन रुग्ण; ८०२ जणांचा मृत्यू
मुंबई, दि. १ – महाराष्ट्रात शनिवारी ६३ हजार २८२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४६ लाख ६५ हजार ७५४ झाली असून अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६ लाख ६३ हजार ७५८ वर पोहोचली आहे.
राज्यात आज ८०२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत ६९ हजार ६१५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,७३,९५,२८८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४६,६५,७५४ (१७.०३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४०,४३,८९९ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून २६,४२० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत चढ-उतार होत असतानाच समाधानकारक बाब म्हणजे राज्यात रुग्ण मोठ्या प्रमाणात बरेही होत आहेत. आज ६१ हजार ३२६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ३९,३०,३०२ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.२४ टक्के एवढे झाले आहे.
पुणे शहर कोरोना अपडेट्स
- दिवसभरात ४०६९ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
- दिवसभरात ४३३९ रुग्णांना डिस्चार्ज.
- पुण्यात करोनाबाधीत ८८ रुग्णांचा मृत्यू. २१ रूग्ण पुण्याबाहेरील.
- १४०२ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
- पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४२३५८७.
- पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ४२९०७.
- एकूण मृत्यू -६८६४.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ३७३८१६. - आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १९३३६.
